Loading ...
/* Dont copy */

हीं दोन बकरीची पोरें - मराठी कविता (आरती प्रभू)

हीं दोन बकरीची पोरें - मराठी कविता (आरती प्रभू) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभू यांची हीं दोन बकरीची पोरें ही लोकप्रिय मराठी कविता.

हीं दोन बकरीची पोरें - मराठी कविता (आरती प्रभू)

हीं दोन बकरीची पोरें आहेत: एक साधें, आपले करडे आहे...

हीं दोन बकरीची पोरें

आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक)

आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातून.

हीं दोन बकरीची पोरें आहेत: एक साधें, आपले करडे आहे, तर दुसरे करडें नाही, पांढरेंही नाही, काळेसुद्धा, दोयें मिळून एक पोरपणाचा रंग. ती समोर नेहमीचीच खिडकी आहे : तीत कुणी उभे नाही, तीतून कुणी पाहत नाही, तीवर पडदाहि नाही, घरांत कुणी खिडकीत उभे राहणारें वावरत असेल, गंमतच आहे ही खिडकी म्हणजे. हा आता डोंगर आला: त्याच्या मागे-पुढे कोण असेल? कसें असेल? कसे नसेल? कुणी गवती असेल, आणि वाराहि गवती आहे, झुळझुळणारा. डोंगर उतरून जाऊं. गेलों. तें खिडकीचें घर खूप खूप मागे गेलें, पाठीमागे रस्ता आहे, पुढेहि रस्ता आहे, वळणावरहि रस्ता आहे, वळणावर झाडहि आहे, वर पक्षीबिक्षी आहेत : अनेक नाहीत, चारदोन चारदोन आहेत, कांही थोडे ओले आहेत, कांही ओलेसुके आहेत, कांही आंतून आंतून सुकेच आहेत. झाडाने कुणाचे वळण गिरवले आहे कोण जाणे! ज्याने डोंगराची रेघ ओढली त्यानेच तर झाडाला वळण दिलें नसेल ना गिरवायला? हा पुन्हा एक म्हातारा : हा तर म्हातारडाच आहे, पिकूनबिकून गेलेला नाही, अगदी सरळ सरळ म्हाताराच होत गेला आहे; मी विचारलें, “कुठे निघालांत?” तो म्हणाला, “मस्णांत.” “जा बापडा,” मी म्हणालों पण मला वाटत नाही तो मस्णांत जाईल म्हणून; तो वळणावर गेला आणि दिसेनासा झाला : मरणारा वळणावरून जाणार नाही असे मला वाटते. हें शहर आलें: हें फार मोठें शहर आहे, इथे खूप खूप बाया झकासपैकी फिरताहेत: आमच्या गावच्या नदीत अशाच होड्या फिरतात; जिथे खूप खूप बाया फिरतात तें शहर आणि होड्या फिरतात तें गाव किंवा खेडें. इथे बाया फिरल्या म्हणून काय झालें? हें शहर असलें म्हणून काय झाले? आपण दोन्ही पाहू - शहर आणि बाया. हा कोण? हा आकाशाकडे तोंड करून एकटाच काय पाहतोय? आपणहि जावें. गेलों. त्याच्या शेजारी त्याला नकळत उभा राहिलों, मग एक एक असे खूप आले, आकाशाकडे तोंड करून उभे राहिले, तो मग पहिला आकाशाकडे पाहणारा ख क करून हसला आणि निघून गेला, सगळे मग निघून गेले, कुणी हसले मात्र नाहीत, मी एकटा उभा राहिलों वर पाहत: आपण च्यायला बावळट. हे दोघे कोण? आणि ते अशा वेळी पुलाखाली का गेले? आपणहि जाऊं. गेलो. आम्ही आता चारजण: ते दोघे, मी आणि काळोख. पहिल्याने टमरेल पुढे केले, दुसऱ्याने त्यात दारूची बाटली ओतली, पहिल्याने टमरेल माझ्यासमोर धरले, मग दुसऱ्याने सुरा बाहेर काढला, मला दाखवला, दुसऱ्याने टमरेलभर दारू पिऊन टाकली, मी धूम पळत सुटलों. आम्ही पळपुटे. ते तिघे: ते दोघे आणि काळोख. आता कुठे जावे? समुद्राकांठी. गेलों. तिथे बाक होतें. बाकाच्या पाठीवर लिहिले होतें: “श्रीयुत फणसेकरांनी हैं बाक चि ० स्वर्गवासी इंदू हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधिलें. १६-१२-५९” मी वाचलें. पुन्हा पुन्हा वाचले. दगडी बाकावर बसलों नाही, समुद्रकांठी गेलों, आणि भणभणत्या वाऱ्यावर मी माझें अंग चिरगुटासारखें धरलें, मग मी पुटपुटलों, "ही कुणा फणसेकरांची इंदू ही पोरवयांत वारली, हिच्या स्मृतीस मीही नमस्कार करतों." मी नमस्कार केला, समुद्र गर्जना करीत होता, वारा भणभणा वाहत होता, मी उभा होतों.

आरती प्रभू यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची