Loading ...
/* Dont copy */

महान आमुचा महाराष्ट्र - मराठी कविता (प्र. श्री. जाधव)

महान आमुचा महाराष्ट्र (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्र. श्री. जाधव यांची महान आमुचा महाराष्ट्र ही मराठी कविता.

महान आमुचा महाराष्ट्र - मराठी कविता (प्र. श्री. जाधव)

महान आमुचा महाराष्ट्र अन् महान आमुचा बाणा...

महान आमुचा महाराष्ट्र

प्र श्री जाधव (नांदेड, महाराष्ट्र)

महान आमुचा महाराष्ट्र अन् महान आमुचा बाणा ॥ ध्रु ॥ ज्योत भक्तीची पाजळवुनी आत्मतेज उजळविले गेले होते राष्ट्र लयाला ऐक्यसांधुनी सावरिले तोच आमुचा विचारवारसा त्यांचेच आम्ही शिष्य जाणा ॥ १ ॥ नामा, तुका, चोखा, एका गोरा, महमद, सखी, जनी, ऐक्याचा कानमंत्र फुंकिती जळी-स्थळी अन् पाषाणी तोच आमुचा विचारवारसा आणि तोच मराठी बाणा ॥ २ ॥ इथे झुंजले वीर शिवबा आणि गाजविली तलवार समतेचा तो झेंडा रोवला शाहू, फुले नि आंबेडकर ताठ आहे मान अजुनी तो ताठ आहे तोच कणा ! ॥ ३ ॥ मुकुंदराजा, महदंबेने दीप मराठीचा चेतविला ज्ञानोबा नि संत तुक्याने वडवानल तो पेटविला प्राकृत ही प्रकृती आमुची अमृताशीही पैज जाणा ! ॥ ४ ॥ धन्य कीर्ती शिवरायांची त्या शूरवीर मावळ्यांची! प्राण फुंकिती अजून येथे तीच गाथा शौर्याची! नसानसांतून रक्त उसळते ऐकताच ‘हरहर’ घोषणा ! ॥ ५ ॥ भीमा, गोदा, नर्मदा, कृष्णा सीना, आसना, तापी, पूर्णा; प्रवरा, पूर्णा, वारणा, गिरणा वैना, पैना, वर्धा, कोयना जल नद्याचे प्राषता ह्या लाभे अमृत जीवना ॥ ६ ॥ सातपुड्याची रांग उत्तरेस कडा पश्चिमेस सह्याद्रीचा विविध डोंगर-रांगांमधुनी झरतो झरा अमृताचा पराक्रमानेच पावन होती रणी लढुनी राणी-राणा ! ॥ ७ ॥ वेगवेगळ्या जाती आमुच्या वेगवेगळ्याच जरी पाती धर्म-पंथ वेगवेगळे परी ‘माणुसकी’ची दृढ नाती गुंफलेले हात ऐक्याचे हे न् उंचावलेल्या ह्याच माना ! ॥ ८ ॥

प्र. श्री. जाधव यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. अनामित०१ मे, २०२५

    मा. संपादक,
    आपल्या 'मराठीमाती.कॉम' या वैश्विक व लोकप्रिय माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचण्याचे एक समर्थ व्यासपीठ मिळाले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद...!

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची