Loading ...

धरणीची हाक - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

धरणीची हाक (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांची धरणीची हाक ही मराठी कविता.

धरणीची हाक - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

उठसूट जंगलं तोडून...

धरणीची हाक

प्रा. डॉ. विलास डोईफोडे (सावनेर, नागपूर, महाराष्ट्र)

(या महिन्यात दिनांक २२ एप्रिल रोजी येणाऱ्या ‘वसुंधरा दिन’ या निमित्ताने) उठसूट जंगलं तोडून मुद्दामच वनवा लावून प्राणवायू कसा भेटन रे भावा! कधी सुचेल शहाणपण? जलसाठे दूषित करुन वर्षा बचतीचा मार्ग सोडून कशी भागवणार तहान रे भावा! कधी सुचेल शहाणपण? जिथं-तिथं कचरा फेकून रसायनं शेतात ओतून काळ्या मातीत कसं पिकन रे भावा! कधी सुचेल शहाणपण? जीवाश्म इंधन जाळून हरितवायू हवेत सोडून तू आपलंच रचतो सरण रे भावा! कधी सुचेल शहाणपण? नदीपात्रात टाकलं भरन पुराचं पाणी वस्तीत शिरण संसार उघड्यावर पडण रे भावा! कधी सुचेल शहाणपण? उभा डोंगर पोखरून केले तू उजाड माळरान घेतले ढिगाऱ्यात गाडून रे भावा! कधी सुचेल शहाणपण? अधिवास भस्म पाहून पशु पक्षी झाले हैराण जिवसृष्टीचे कर रक्षण रे भावा! कधी सुचेल शहाणपण? लोकसंख्येचा वाढतो ताण बदललं फार हवामान ठेव शाश्वत दृष्टिकोन रे भावा! कधी सुचेल शहाणपण? निसर्गाचं लागतं देणं एवढं तरी समजून घेणं या धरणीला कोण तारण रे भावा! कधी सुचेल शहाणपण?

प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची