Loading ...
/* Dont copy */

मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया... - माझं मत (आशा तेरवडिया)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका आशा तेरवडिया यांचे मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया... हे माझं मत या विभागातील लेखन.

मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया... - माझं मत (आशा तेरवडिया)

मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया... आणि त्यांना बघून मला पडलेला प्रश्न.

मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया...

आशा तेरवडिया (पुणे, महाराष्ट्र)

रडणाऱ्या बाळाला कवटाळून शांत करणारी, चिऊ काऊची गोष्ट सांगून, त्याला घास भरवणारी, लेकाच्या आजारपणात रात्र-रात्रभर जागून त्याची देखभाल करणारी ही आई मला खूप सुंदर वाटली.

नातवंडांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून नकळतपणे चांगले संस्कार करणारी, स्वतःच्या हाताने एखादा पदार्थ तयार करून त्यांना खाऊ घालणारी आणि तो पदार्थ नातवंडांना आवडला की स्वतःच तृप्तीची ढेकर देणारी आजी पाहिली आणि मला ती खूप सुंदर वाटली.

नवऱ्याच्या सोबतीने विटा वाहून एकावर एक रचून लोकांचे घर बांधणारी, मातीच्या ढिगार्‍यावर बसलेल्या स्वतःच्या लेकराला लागलेली भूक ओळखून त्याच्या हातात भाकरीचा तुकडा देणारी ती आई मला विलक्षण सुंदर भासली.

नवर्‍याने आत्महत्या केल्यावर विधवा म्हणूज खच्ची न होणारी, स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून उभी राहणारी, स्वतःच्या मुलांसोबतच सासू-सासर्‍याला भक्कमपणे सांभाळणारी आणि नवर्‍याने केलेले कर्ज व्याजासहित फेडणारी, ती शेतकर्‍याची बायको पाहिली आणि मला ती खूपच सुंदर भासली.

लोकलचा प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहोचणारी पण लॉकल मधला तासाभराचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून हातशिलाई करुन, स्वतःच्या संसाराला आर्थिक ठिगळ जोडू पाहणारी ती ही मला विलक्षण सुंदर भासली.

मुलात मूल होऊन रमणारी, मुलांना न आवडणारा आभ्यास पण हसत खेळत आणि आनंदाने करायला लावणारी, गणितातील उदाहरणे समजल्याचा मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून कृतार्थ होणारी, नाठाळ मुलांना आईच्या ममतेने, प्रेमाने समजावून सांगणारी, ती शिक्षिका पाहिली आणि मला ती खूप सुंदर भासली.

लौकिकार्थाने सामान्य दिसणाऱ्या आपल्या समोरील स्त्रीला, वेगवेगळी सौदर्यप्रसाधने वापरून सुंदर बनवण्यासाठी तिने पदर खोचला आणि कामाला लागलेली तीच मला विलक्षण सुंदर भासली.

या साऱ्या सुंदर स्त्रिया बघून मला प्रश्न पडला; यामागे काय कारण असावं?

नियोजन, त्याग, समर्पण, कर्तव्यदक्षता, संवेदनशीलता, बांधिलकी, जवाबदारीचे भान इत्यादी गुणांची निसर्गदत्त देणगीच मिळाली आहे स्त्रीला; या गुणांच्या जोरावर कोणतेही आव्हान ती सहजच पेलू शकते. तिच्यातील या गुणांना कुटुंबीय, समाज, परिसर इत्यादींची सकारात्मक साथ मिळाली, तर त्या कुटुंबाचा, समाजाचा, परिसराचा उत्कर्ष झालाच म्हणून समजा...

मैत्रिणींनो, उघड्या डोळ्यांनी अवतीभवती पाहिले तर अशा सुंदर स्त्रियांची यादी नक्कीच वाढत जाईल. गरज आहे ती स्वच्छ दृष्टीची, ‘चांगल्याला चांगलं’ म्हणणाऱ्या मोठ्या मनाची, दुसऱ्या स्त्रीचं खरंखरं कौतुक करण्याची...

अशा दैवी देणगी लाभलेल्या स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून न पाहता आदराने ज्या दिवशी पाहिले जाईल, तो दिवस खऱ्या अर्थाने ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा होईल असं मला वाटतं!

आशा तेरवडिया यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची