Loading ...

भ्रष्ट सारी माकडे - मराठी कविता (मंगेश पाडगांवकर)

भ्रष्ट सारी माकडे - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगांवकर यांची भ्रष्ट सारी माकडे ही लोकप्रिय मराठी कविता.

भ्रष्ट सारी माकडे - मराठी कविता (मंगेश पाडगांवकर)

थोर आपण मानिली ही भ्रष्ट सारी माकडे...

भ्रष्ट सारी माकडे

मंगेश पाडगांवकर (१९२९ - २०१५)

थोर आपण मानिली ही भ्रष्ट सारी माकडे... अन् दिले हातांत त्यांच्या पेटलेले काकडे! कां अता छाती पिटावी लागतां आगी घरां... देव येइल कोणता हे निस्तराया सांकडे! धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे या उड्या... याचसाठी लाभलेले पाय यांना फाकडे! काल ज्या झाडांवरी ही आश्रयाला थांबली... आज ही शत्रूप्रमाणे पाहती त्यांच्याकडे! जा कुठेही हीच तेथे चेहरे फेंदारुनी... पाय जेथे टाकिती ते सर्व रस्ते वाकडे! पक्ष यांचा कोठला टोळी तयांची कोठली? जात यांची एक अंती, प्रश्न सारे तोकडे! हालवोनी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या... आणि तुमच्या चितेस्तव शोधुनी ही लाकडे! (१० मार्च, १९८१)

मंगेश पाडगांवकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. अनघा जी. धोपटकर१८ मार्च, २०२५

    आजच्या राजकिय परिस्थीतीला साजेशी कविता आहे ही.
    आदरणीय मंगेश पाडगावकर हे द्रष्टे कवी होते असे म्हणावे लागेल.

    उत्तर द्याहटवा
  2. एन. डी. सहस्त्रबुद्धे२३ मार्च, २०२५

    पाडगावकरांची इतकी मार्मिक आणि सुंदर काव्य रचना आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची