Loading ...

कसला विषारी उजेड - मराठी कविता (अरुण म्हात्रे)

कसला विषारी उजेड - मराठी कविता (अरुण म्हात्रे) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी अरुण म्हात्रे यांची मराठी कविता कसला विषारी उजेड.

कसला विषारी उजेड - मराठी कविता (अरुण म्हात्रे)

हा कसला विषारी उजेड वाढलाय? घरात घराबाहेर...

कसला विषारी उजेड

अरुण म्हात्रे (अरुण जगन्नाथ म्हात्रे प्रसिद्ध कवी आणि गीतकार. मुंबई, महाराष्ट्र)

हा कसला विषारी उजेड वाढलाय? घरात घराबाहेर वस्तीवस्तीत गावागावातल्या चौकाचौकात सारखा धूर येतोय उजेडातून... डोळ्यात घुसतोय... दिसतच नाही पुढचे काही त्यात... ना वर्तमान... ना भविष्य... धूर ओळखीचा.. विद्वेषाचा, तिरस्काराचा, अपमानाचा, वंचनेचा... येतोय छोट्या छोट्या बिळातून... पण बिळाभोवती हे चक्क पूजा आरतीचे साहित्य! हे कसे? विद्वेषाची पूजा करणारा हा कोणता धर्म आहे? कोण आहेत हे लोक? चालत राहिलेत लोक चालायचंच म्हणून चालावं लागतच जेव्हा लोंढ्यांनी लोक चालतात तेव्हा... पाय साखळदंडात बद्ध आहेत आणि तरी ते सांगतात, चला धावा कळसाच्या दिशेने. पण कळस कोणता ते सांगत नाहीत. कळस कसलाही असू शकतो... कळस म्हणजे अतिरेक... कसलाही असू शकतो अतिरेक... अन्यायाचा... तिरस्काराचा... विद्वेषाचा... वंचनेचा... लोक मोर्चाने चाललेत धुराच्या उजेडातून... आणि आता तर ते म्हणू लागलेत - “आधीचे सगळे झेंडे उतरवा खाली. बंद करा ती प्रेमाची मानवतेची माणुसकीची कोवळी गाणी... आस्था, कळवळा, सन्मान, माणुसकी, प्रेम, फुलेबिले असली प्रेमळ भंकस नको आता!” एक झेंडा आहे त्यांच्यापाशी रफू केलेल्या रंगाचा झेंडा अविचल आहे तो काळ्या पत्थरासारखा... त्यांना त्याचे फडफडणे ही नकोय... झेंडा स्थिर हवाय त्यांना ...आणि त्या झेंड्यापायी त्यांना नेहमीची हवाही थांबवायची आहे वाहणारी. आता ते लोकांना चौकात जमवतील, सर्वांना माना खाली घालण्याचा आदेश देतील आणि मग सर्वांच्या माना खाली गेल्या की ते आकाशवाणी ऐकवतील... सारे ऐकतील ती आकाशवाणी माना खाली घालून जमिनीकडे पाहत मग सांगितले जाईल आकाशवाणीवरून - “अशाच माना खाली घालून सगळे व्यवहार करायचे बरं यापुढे... आकाश बघायचेच नाही किंवा यापुढे आम्ही दाखवू तेच आपले आकाश असेल!”

(१९ मार्च, २०२५)

अरुण म्हात्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची