Loading ...

तुझी फुले - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

तुझी फुले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ. विलास डोईफोडे यांची तुझी फुले ही मराठी कविता.

तुझी फुले - मराठी कविता (विलास डोईफोडे)

तुझी फुले तुलाच वाहतो, स्वार्थ यात मी माझा पाहतो...

तुझी फुले

डॉ. विलास डोईफोडे

तुझी फुले तुलाच वाहतो स्वार्थ यात मी माझा पाहतो शब्द तुझे स्वरसाज तुझा काळवेळ ही तुझी भूपाळीचा सुर मी आळवितो तुझी फुले तुलाच वाहतो श्रीफळ तुझे बेलपत्र तुझेच अबीर गुलाल तुझा विधात्यास श्रद्धेने मी पुजितो तुझी फुले तुलाच वाहतो समिधा तुझी तूप ताप तुझा श्वेतचंदनही तुझेच यज्ञात या आहुती मी अर्पितो तुझी फुले तुलाच वाहतो झरा तुझा सरिता तुझीच प्रचंड प्रपात ही तुझा जल अभिषेक मी करवितो तुझी फुले तुलाच वाहतो गंध तुझा प्राणवायू देशी तू वाऱ्यालाही गती तुझी श्वास मात्र मोकळा मी ओढतो तुझी फुले तुलाच वाहतो क्षितिज तुझे किरणे तुझीच रंग ही उधळीशी तू नजरेचे पारणे मी फेडतो तुझी फुले तुलाच वाहतो मृदा निर्मिली अंकुर तुझेच पाऊसधाराही तुझ्या शिवारात उभे पीक मी कापतो तुझी फुले तुलाच वाहतो उमगले आता आहे जे दृष्टीस माझे काय या सृष्टीत मी तर व्यर्थ अभिमान ठेवतो तुझी फुले तुलाच वाहतो गर्वाचे हरण निसर्गाचे रक्षण या वचनाला मी सार्थ जागतो तुझी फुले तुलाच वाहतो स्वार्थ यात मी माझा पाहतो

विलास डोईफोडे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. प्रकाशित केल्याबद्दल "मराठीमाती" चे अनेक धन्यवाद 🙏
    (तुझी..= भगवंत किंवा निसर्ग )
    प्रा. विलास डोईफोडे

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची