Loading ...
/* Dont copy */

यंदा म्हणे गावला - मराठी कविता (सुदेश इंगळे)

यंदा म्हणे गावला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी सुदेश इंगळे यांची यंदा म्हणे गावला ही मराठी कविता.

यंदा म्हणे गावला - मराठी कविता (सुदेश इंगळे)

सोडला दगड, सोडली पंढरी...


यंदा म्हणे गावला - मराठी कविता (सुदेश इंगळे)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीसुदेश इंगळे’ यांची ‘यंदा म्हणे गावला’ ही मराठी कविता.



यंदा म्हणे गावला
भुयारात गाभारा
जुनी एक मूर्ती
दिसो आली

कोण्या मूर्तीत
गुंतवावा जीव
पांडुरंग स्वतः
कंफ्यूजला

कंफ्यूजून मग
पोराटकी सुरू
दहा वीस तीस
करू लागे

वैतागून त्याने
गाठले वाळवंट
उगा एकटक
बैसियला

आणि खंगाळली
जुनी चंद्रभागा
चैतन्याचा झरा
सापडेना

एकाएक भानी
आला पांडुरंग
कैदेची जाणिव
झणाणली

सोडला दगड
सोडली पंढरी
विश्वाची वारी
संपादली

उलटा प्रवास
मोकळा निःश्वास
विश्वाचा वारकरी
पांडुरंग


यंदा म्हणे गावला - मराठी कविता (सुदेश इंगळे) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- सुदेश इंगळे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची