Loading ...

मी नजरेला खास नेमले - मराठी गझल (इलाही जमादार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी गझलकार इलाही जमादार यांची भावनांची वादळे या गझलसंग्रहातील मी नजरेला खास नेमले ही लोकप्रिय मराठी गझल.

मी नजरेला खास नेमले - मराठी गझल (इलाही जमादार)

मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी...


मी नजरेला खास नेमले - मराठी गझल (इलाही जमादार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी गझलकार इलाही जमादार यांची ‘भावनांची वादळे’ या गझलसंग्रहातील ‘मी नजरेला, खास नेमले’ ही लोकप्रिय मराठी गझल.



मी नजरेला, खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटते, ती भिरभिरते, तुला पाहण्यासाठी

म्हणून तू, जाहलीस माझी, माझी, केवळ माझी
किती बहाणे, केले होते, तुला टाळण्यासाठी

घडीभराने, मलूल होतो, गजरा वेणीमधला
खरे सांगतो, खरेच घे हे, हृदय माळण्यासाठी

गुपचुप येउन भेटत असते, तुझी आठवण मजला
तिचा दिलासा, मला पुरेसा, आहे जगण्यासाठी

कधी कवडसा, बनून यावे, तुझ्या घरी एकांती
उघडझाप करशील मुठीची, मला पकडण्यासाठी

तू म्हणजे गं, फूल उमलते, गंध तुझा मी व्हावे
दवबिंदू, व्हावेसे वाटे, तुला स्पर्शिण्यासाठी

तुझी साधना, करता करता, अखेर साधू झालो
निर्मोही, जाहला ‘इलाही’, तुला मिळविण्यासाठी

- इलाही जमादार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची