Loading ...

घेतो मी शेवटचं पुस्तक (मराठी कविता)

घेतो मी शेवटचं पुस्तक (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी आदेश ताजणे यांची घेतो मी शेवटचं पुस्तक ही मराठी कविता.

घेतो मी शेवटचं पुस्तक (मराठी कविता)

हे आज घेतो मी शेवटचं पुस्तक


घेतो मी शेवटचं पुस्तक (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘आदेश ताजणे’ यांची ‘घेतो मी शेवटचं पुस्तक’ ही मराठी कविता.



हे आज घेतो मी शेवटचं पुस्तक
कितीतरी जणांनी वाचलेलं, हाताळलेलं
तुही मागे एकदा घेतलेलं
घेतो आज मी हे शेवटचं पुस्तक

तुला मी पाहिलं पहिल्यांदा
हरवून गेली होतीस पुस्तकांच्या गर्दीत
मग तुही आवडलीस आणि ती गर्दीतली पुस्तकंही

मग मी ते पुस्तक उचललं तू जे ठेवलं होतं
तू मला दाखवलास गालिब आणि शेक्सपिअर
त्यांनी मला दाखवलं तुझं प्रेम

ती पुस्तकं त्यांना झालेला तुझा स्पर्श
तू कधी तुझे दोन बोट ओठांना लावून
ओली केलीस का ती पानं?

मीही तीच पानं माझ्या ओठांना लावतो
मीही जगतो तू जगलेल्या गोष्टी
तू वाचलेल्या पुस्तकातून

असेच आपण दोघे बोलतो, स्पर्श करतो, ओळखतो
एकमेकांना त्या पुस्तकांच्या गर्दीत
त्या जगात

गालिबच्या आणि शेक्सपिअरच्या
आपण आणि आपलं प्रेम
बसलंय त्यांच्या पुस्तकात

- आदेश ताजणे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची