Loading ...

अपूर्ण जीवन (अनुभव कथन)

अपूर्ण जीवन (अनुभव कथन) - सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे असे म्हणतात, परंतु यामुळे माणसे आणखी दुरावत चालली आहेत, मनिषा फलके यांचे अनुभव कथन.

अपूर्ण जीवन (अनुभव कथन)

व्यक्त होणे, बोलते होणे हे फार गरजेचे आहे.


अपूर्ण जीवन

सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे असे म्हणतात, परंतु यामुळे माणसे आणखी दुरावत चालली आहेत. अपूर्ण जीवन मनिषा फलके यांचे अनुभव कथन.



आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. त्या काही चांगल्या असतात तर काही वाईट. घडलेल्या वाईट घटनांमधून योग्य तो बोध घेऊन आपण पुढे वाटचाल करायची असते. त्यातील काही घटना अश्या असतात की त्यांची उत्तरे ही नेहमीच अनुत्तरितच राहतात. त्या प्रश्नाचा कितीही उहापोह केला तरी त्यांची उत्तरे कधीच मिळत नाही.

प्राजक्ता, माझ्या जुन्या कार्यालयातील सहकारी नि माझी मैत्रीण. नेहमीच हसरी नि खेळकर. तिचे खळखळून हसणे फार आवडायचे मला, किंबहुना मी तिच्या हसण्यावर फिदाच होते असे म्हणा ना! तिला कधीच कोणत्याच व्यक्तीचा राग यायचा नाही नि आलाच तरी तो तिच्या मनात नि चेहऱ्यावर कधीच दिसला नाही.

दोन वर्ष आम्ही एकत्र काम केले. ती repairing And service विभागात कार्यरत होती तर मी sales विभागात. आम्ही दोघी एकाच शहरातील व एरियातील असल्यामुळे आमचे येणेजाणे एकत्र होते. ऑफिसमधील काम आणि शिस्त पाळून केलेली मौजमस्ती, तर office सुटल्यानंतरची धमाल. ते दिवस आजही आठवतात. ते दिवसच खूप भारी होते, जणू काही फुलपाखरासारखे. Office सुटल्यानंतरची घेतलेली कटींग नि केलेल्या पार्ट्या अगणितच.

कालांतराने काहींनी ऑफिस change केले तर काहींची लग्ने झाली. यामुळे सर्व मैत्रिणी विखुरली गेल्या. प्राजक्ता चे लग्न माझ्याआधी झाले होते. संसाराच्या रहाटगाड्यामध्ये गुंतल्यावर कालांतराने फोन आणि भेटणे कमी झाले.

आणि काही निमित्ताने जेव्हा परत एकदा संपर्कात आलो तेव्हा एक धक्कादायक बातमी कळली की, प्राजक्ता च्या आईवडिलांनी आत्महत्या केली... हे ऐकून मन सुन्न झाले. कान बधीर झाले होते. नि:शब्द झाले होते मी. ही घटना घडूनही जवळपास एक महिना उलटला होता.

तिला धीर देण्यासाठी...


आपल्या एवढ्या जवळची मैत्रीण असूनही आपण अश्यावेळी तिला धीर देण्यासाठी तिच्यासोबत नाही हे मनाला खूप लागले. तिला एक फोन वा मॅसेज आपण का केला नाही, दुःखांचा डोंगर तिच्यावर कोसळलेला असताना आपण तिच्या सोबत का नव्हतो अश्या अनेक प्रश्नांनी मन खाऊ लागले. आपल्याच विश्वात आपण किती गुरफटून गेलो आहोत याची जाणीव झाली.

पण जेव्हा समजले तेव्हा आम्ही तिला भेटायला गेलो. तिला बोलते करून तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली. नेहमीच हसत खेळत राहणारी प्राजक्त फुलासारखी माझी मैत्रीण पार कोमेजून गेली होती. हळूहळू ह्या सर्व प्रसंगातून ती स्वतःला सावरत होती, इतरांना सांभाळत होती.

बोलण्याच्या ओघात समजले की, प्रकृतीच्या काही कारणांमुळे हे सर्व घडले होते. वयोमानानुसार प्रौढ माणसांमध्ये शारीरिक तक्रारी चालू होतात, हे मान्य असले तरी स्वतःला नैराश्याच्या गर्तेत ढकलून असा टोकाचा निर्णय घेणे हे चूकच. एवढी वर्ष अविरत कष्ट करून, नेटाने संसार करत जेव्हा सुखपभोग घेण्याची वेळ येते तेव्हा अशी एक्झीट घेणे न पटण्यासारखे आहे. अर्थात याला नाण्याची दुसरी बाजू ही असेल.

हे फार गरजेचे आहे...


व्यक्त होणे, बोलते होणे हे फार गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे असे म्हणतात, परंतु यामुळे माणसे आणखी दुरावत चालली आहेत. संसाराच्या रहाटगाडा चालवताना राहून गेलेल्या इच्छा, आकांशा पूर्ण करणे अपेक्षित आहे. एकमेकांना वेळ देणे, काळजी घेणे, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणे, इच्छा पूर्ण करणे, छंद जोपासणे, निसर्गाचा आस्वाद घेत एकमेकांच्या सहवासात रमणे, नातवंडाबरोबर खेळण्यात दिवस घालवणे. अश्या प्रकारे आपण आपल्या जीवनातील ताण - तणाव दूर ठेवू शकतो.

एखाद्या विचाराने आपल्या मन व शरीरावर ताबा मिळवला की आपण हळूहळू त्याच्या अधीन जातो. आपल्या आयुष्यात आलेले एखादे संकट व वाईट परिस्थिती हे फार काळ राहत नाही. हेही दिवस जातील या एका आशेवर एक मध्यमवर्गी माणूस जगात असतो. संकटाना घाबरून पळवाट शोधणे हा त्यावरील उपाय नाही, तर कठीण काळातही एकमेकांची साथ देणे हे खरे सहजीवनाचे सूत्र आहे किंबहुना ते तेव्हाच पूर्णत्वास जाते अन्यथा ते अपूर्ण जीवनच जगले असे संबोधले जाते.

येथे विंदा करंदीकर यांच्या एका प्रसिद्ध कवितेच्या ओळी अधोरेखित कराव्याशा वाटतात...

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयासी मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...


अपूर्ण जीवन (अनुभव कथन) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- मनिषा फलके

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची