Loading ...
/* Dont copy */

म्हणून कविता करायच्या असतात (मराठी कविता)

म्हणून कविता करायच्या असतात (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी आदेश ताजणे यांची म्हणून कविता करायच्या असतात ही मराठी कविता.

म्हणून कविता करायच्या असतात (मराठी कविता)

अक्षर नीट नसेल तरी चालेल, कविता कधीही वाचली नसेल तरी चालेल


म्हणून कविता करायच्या असतात (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘आदेश ताजणे’ यांची ‘म्हणून कविता करायच्या असतात’ ही मराठी कविता.



अक्षर नीट नसेल तरी चालेल
कविता कधीही वाचली नसेल तरी चालेल
पण मग प्रेमात पडल्यावर का बरं लोक कविता करतात?
पण मग मीही त्या सगळ्या कविता एकदा वाचूनच काढल्या
एक एक पार धुंडाळून वाचल्या काही काही तर चोरुन वाचल्या
पण मला कवितेत असलेली प्रेयसी मात्र कधीच सापडली नाही
मग शेवटी एका प्रेमात बुडालेल्याकडेच थेट गेलो
तो म्हणाला, अरे वेड्या...

तो म्हणाला, अरे वेड्या...
कविता कधीही कोणाला येत नसतेच मुळी
आणि कवितेतली प्रेयसी शोधून सापडत नसते कधी
मग जी कोणी भेटेल, कशी असेल, तिला आपलं म्हणायचं असतं
कशीही असली तिला चंद्र म्हणायचं असतं
साधी जरी नसली तिला सरळ म्हणायचं असतं
वाकडी जरी असली ती तिला वेडी म्हणायचं असतं
सुंदर जरी नसली ती तिलाच कतरिना, करिना आणि ऐश्वर्या म्हणायचं
कवितेत तसं असतं म्हणून प्रेम करायचं नसतं
प्रेम तिच्यावर असतं म्हणून कविता करायच्या असतात

- आदेश ताजणे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची