Loading ...

रमेचं लग्न (मराठी कथा)

रमेचं लग्न (मराठी कथा) - फार मोठ्या संकटातून बाहेर पडणाऱ्या रमेचं लग्न साजरं करणारी एक सरळ साधी मात्र रंजक कथा.

रमेचं लग्न (मराठी कथा)

एक सरळ साधी मात्र रंजक कथा...रमेचं लग्न


रमेचं लग्न (मराठी कथा)

रमेचं आज लग्न आहे. डोळ्यातून अथक अश्रू वाहत आहेत, कसले? आनंदाचे? फार मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचे? माहिती नाही. गौरीहर पूजताना नकळत भूतकाळात ओढली गेली.



एम. बी. ए. ची हुशार विद्यार्थिनी असलेल्या रमेला खूप खूप शिकायचे होते. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. परिस्थिती बेताची असूनही आई बाबांनी तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आता तिला जीवतोड मेहनत करून ते स्वप्न पूर्ण करायचं होतं.

पण दैवाला जणू मंजूर नव्हतं. त्या दिवशी लेक्चर जरा जास्तच लांबलं. बापरे! आता घरी जाई पर्यंत रात्रीचे ११ तरी वाजतील. आपल्या परिसरात दिवे सुद्धा नसतात किती वेळा. आई बाबांना काळजी लागून राहील म्हणून तिने मेसेज पाठवला स्टेशनवर उतरली तेव्हा ११ वाजून गेले होते. रिक्षाने एकटीच नको त्या पेक्षा चालत जाऊ असा विचार करून भरभर चालू लागली. हळू-हळू रस्ता सुनसान होत गेला.

तेव्हढ्यात मागून दोन-तीन दारुडे तिच्या मागे चालत आले. एखाद्या श्वापदाने भक्षावर झडप घालावी तसे तिघेही तिच्यावर तुटून पडले. पुढे काय झाले माहिती नाही.

शुद्ध आली तेव्हा हॉस्पिटल मध्ये आहोत हे लक्षात आले आणि कालचा प्रसंग आठवला. आजू बाजूला डॉक्टर, मीडियाची माणसं एका मागून एक प्रश्न विचारत होती. आई-बाबा सुन्न होऊन बसले होते.

दिनेश आज उशीराच उठला. टी.व्ही. लावला तर सगळ्या वाहिन्यांवर हीच बातमी. दिनेश ताडकन उठला त्याला कालचा प्रसंग आठवला. त्याने अशोक आणि शामने केलेले कृत्य आठवले. समोर त्या मुलीचा वेदनेने कळवळणारा चेहेरा दाखवत होते. वासना माणसाला पशु बनवते; कुठे जातात संस्कार? काय करून बसलो आपण. आपल्याला सुद्धा बहिण आहे हे विसरलो आपण. तो हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागला. नगरपालिकेच्या हॉस्पिटल जवळ पोचला तिच्या पलंगाजवळ गर्दी होती तिचा ओझरता चेहेरा पहिला आणि जीव कळवळला.

दिनेश रोज येत होता रमेसाठी काहीतरी करावं वाटत होतं पण सुचत नव्हतं. त्यातच तिला एड्स ची लागण झाल्याचं डॉक्टर कडून कळलं. रमा आणि तिचे आई वडील कोलमडून गेले. तिला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. दिनेश त्यांच्या मागून घरापर्यंत गेला. काही निश्चय करून घरात गेला. म्हणाला,

“आई-बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी. कशी आहे रमा?”
ते म्हणाले. “जिवंत आहे.”
“असं का बोलता बाबा?”

“मग काय म्हणू? तिने न केलेल्या अपराधाची शिक्षा ती भोगते आहे, भोगणार आहे. आम्ही आहोत तो पर्यंत ठीक आमच्या माघारी कोण देणार तिला आधार?”
दिनेश म्हणाला, “बाबा मी रमेशी लग्न करीन आत्ता आज.” त्याने सगळी हकीकत त्यांना सांगितली.

रमेच्या आई बाबांनी विचार केला, देशात असे अनेक बलात्कार होत असतात पण किती जणांना पश्चात्ताप होतो? आणि किती जण प्रायश्चित्त घेऊ इच्छितात? रमेला समाजात मान परत मिळवून देत असेल तर काय हरकत आहे? चूक तर त्याने केली आहे आणि त्याला कबुल पण आहे.

आज रमेचं लग्न आहे, या बर कां तिला आशिर्वाद द्यायला.

- अर्चना कुळकर्णी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची