Loading ...

या भारतात बंधुभाव - मराठी कविता (संत तुकडोजी महाराज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे) यांची या भारतात बंधुभाव ही लोकप्रिय मराठी कविता.

या भारतात बंधुभाव - मराठी कविता (संत तुकडोजी महाराज)

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे...

या भारतात बंधुभाव

संत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे)

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे । हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे । मतभेद नसू दे । नांदतो सुखे गरिब-अमिर एकमतानी । मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी । स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे । दे वरचि असा दे । सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना । हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना । उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे । दे वरचि असा दे । हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी । खळनिंदका-मनीही सत्य न्याय वसू दे । दे वरचि असा दे । सौंदर्य रमो घरा-घरात स्वर्गियापरी । ही नष्ट होऊ दे विपत्ति भीती बोहरी । तुकड्यास सदा या सेवेमाजी कसू दे । दे वरचि असा दे ।

संत तुकडोजी महाराज यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची