Loading ...

नव्या युगाची गाणी - मराठी कविता (वंदना विटणकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री वंदना विटणकर यांची नव्या युगाची गाणी ही लोकप्रिय मराठी कविता.

नव्या युगाची गाणी - मराठी कविता (वंदना विटणकर)

एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची

नव्या युगाची गाणी - मराठी कविता (वंदना विटणकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री वंदना विटणकर यांची नव्या युगाची गाणी ही लोकप्रिय मराठी कविता.

एकमुखाने चला गाऊ या, गाणी नव्या युगाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची

सा म्हणतो साथी आपण, भेदभावना दूर करा
रे म्हणतो रेंगाळु नका रे, सदैव अपुले काम करा
निर्धाराने पुढे जाऊ या, पर्वा करू ना कोणाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची

ग म्हणतो गर्व मिरवुनी, सर्वनाश कुणी करू नका
म म्हणतो महान सुंदर, मानवतेचा मंत्र शिका
प म्हणतो परिश्रमाने, फुलवा ज्योत यशाची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची

ध म्हणतो जगात केवळ, समानता हा धर्म खरा
नि म्हणतो निर्मळतेचा, मनी वाहू द्या नित्य झरा
सा म्हणतो सामर्थ्याने, उजळा उषा उद्याची
सारे मिळुनी चला गुंफुया, सरगम सात सुरांची

- वंदना विटणकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची