Loading ...
/* Dont copy */

वैकल्पिक आनंद (स्फुटलेखन)

वैकल्पिक आनंद (स्फुटलेखन) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद लेखिका श्रुती चव्हाण यांचे वैकल्पिक आनंद हे स्फुटलेखन.

वैकल्पिक आनंद (स्फुटलेखन)

काल्पनिक सुख हे क्षणिक आहे खरं, पण...


वैकल्पिक आनंद

जेव्हा कधी अलगद गालावरती नाजूक किंवा सौम्यपणाचं हसू असतं तेव्हा नक्की समजून जायचं की नक्कीच काल्पनिक सुखाचा भोग घेत असावा



जेव्हा कधी अलगद गालावरती नाजूक किंवा सौम्यपणाचं हसू असतं तेव्हा नक्की समजून जायचं की नक्कीच काल्पनिक सुखाचा भोग घेत असावा. म्हणजेच की तर वैकल्पिक आनंद. या वैकल्पिक सुखाची अनुभूती तर सारखेच असते. जास्तीत जास्त तारुण्य वयात जरा जास्तच काल्पनिक सुख घेण्याची चटक लागते आणि कधी कधी ह्याच सुखाची चटक दुःखात निर्माण होते जेव्हा वर्तमान काळाच्या अस्तित्वाची जाणीव होते. खरंतर हे जे काल्पनिक विचार विनिमय हे सुख देणारे वर्तमान काळातील कधीच नसतं.

प्रत्येक वेळेस मनुष्य वर्तमान काळातलं काहीतरी ठरवत असतो नाहीतर भूतकाळात केलेल्या चुकांशी सहमत होण्याचा प्रयत्न करत असतो. काही क्षणासाठी हे सुख खूप मौल्यवान किंवा हवंहवसं वाटतं पण ते शेवटी काल्पनिक ती काल्पनिकच.

खरंतर या सुखात एक वेगळाच आनंद असतो. जसं मन म्हणालं तसं चाललेला तो संवाद किंवा ते डोळे मिटल्यावर उमटलेले चित्र! कसं जसं हवं तसं घडत असतं, पण ते बंद डोळ्याआड एवढंच! या क्षणाला आपण कदाचित वर्तमान काळाचे किंवा चालू असलेल्या आयुष्याचे मूळ संबंध साधलेला नसतो पण हे काही क्षणात क्षणिक सुख मात्र चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम करतं. कदाचित त्या मर्यादित वेळे पुरतंच पण ते येतं हे नक्की.

खरं तर या काल्पनिक उपभोगातून बाहेर पडलं की खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊन त्याला जास्तीचं क्षणाचं दुःख होतं खरं. पण कधी कधी ह्या ना अशा बऱ्याच दुःखाची आपण सवय लावून घेतली आहे याची आपल्याला कदाचित जाणीव होत नसावी. पण ही सल कधी ना कधी बोचतेच.

सुख तर आपण काल्पनिक पण घेतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सर्व मध्यमवर्गीय लोक हे कदाचित जगण्यापेक्षा काल्पनिक सुखाचा जास्त भोग घेत असावेत. खूप जण तर काल्पनिक सुखाच्या आहारी गेलेले दिसून येते. जेव्हा मनुष्य भूतकाळ किंवा भविष्यकाळाविषयी गहन विचार करतो, तेव्हा नक्कीच कुठेतरी मनाला काल्पनिक दुःखाची सल लागते. “या सुखातून फक्त अस्तित्वाची जाणीव करून देण्याची ताकद आहे” असं वाटतं. समझणं जरा कठीण पण समजून लक्षात घेणे हे महत्त्वाचं.

या काल्पनिक सुखाचा जीवनात उपभोग घेण्यासाठी काही लोक म्हणजे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोक त्याच्यासाठी झगडतात, कष्ट करतात, सगळं पणाला लावतात. पण ते म्हणतात ना आपण किती कष्ट करतो त्यावर किंवा आपल्या क्षमतेवर आपल्याला काम मिळतं. हेच काही लोक त्यांची धडपड करून मिळवतात आणि त्या काल्पनिक सुखाच्या हात धरून मागे लागलेली असतात. नाहीतर सराईत लोकही त्या फक्त काल्पनिक सुखावर किंवा त्या बंद डोळ्याआडच्या स्वप्नांवर जगतात किंवा आपल्या आयुष्यात त्या मनात स्वप्नात बांधून झगडून ठेवत असल्यामुळे तर तरुण पिढीही नाईट क्लब असल्या मन वळवणाऱ्या गोष्टींकडे धावू लागली आहे.

काल्पनिक सुख हे क्षणिक आहे खरं, पण त्या स्वप्नांचा सुखांचा पाठलाग हा साधा सरळ नक्कीच नाही किंवा नसावा असं माझं मत आहे.

हे सुख म्हणजे एका तरुण - तरुणीचे स्वप्न असू शकतं. देशासाठी लढण्याचं, देशासाठी झगडण्याचं, मान राखण्याचं, एक स्वाभिमानी जॉब मिळवण्याचं, एक मोठा बिझनेस करायचं किंवा तरुणांत तरुणीचा विचार असे एक ना अनेक मनातले स्वप्न, म्हणजेच काल्पनिक सुख.

कदचित या सुखातून नक्कीच गालावर अलगत हसु आलं असावं. आपण कष्ट करून मिळवलेली पदवी याच्याहून आनंद तो कुठला! हेच सुख मनात दरवळत असतं. तेच मनाचं सुख हे काल्पनिक सुख या नावाने सुख फक्त काल्पनिकच राहून न जाता याच्यासाठी ते वर्तमानात रूपांतर करता आलं पाहिजे. मगच ते मनाला भावेल आणि मगच खऱ्या सुखी आयुष्याचा काळ सुरू होईल.



वैकल्पिक आनंद संबंधी महत्त्वाचे दुवे:


- श्रुती चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची