Loading ...

निसर्गाचे धन्यवाद (मराठी कविता)

निसर्गाचे धन्यवाद (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अमित सुतार यांची निसर्गाचे धन्यवाद ही कविता.

निसर्गाचे धन्यवाद (मराठी कविता)

अखंड समुद्र, वाहती नद्या, सुंदर तळे, वाहतो झरा


निसर्गाचे धन्यवाद (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘अमित सुतार’ यांची ‘निसर्गाचे धन्यवाद’ ही मराठी कविता.



अखंड समुद्र, वाहती नद्या
सुंदर तळे, वाहतो झरा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

रंगीत फुले, चवदार फळे
कडशान्य, भाज्या, शेतात पेरा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

झाडे लावा, झाडे जगवा
पर्यावरणाचे रक्षण करा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

गोड, आंबट, तिखट, खारट
न्याहरी, जेवण मजा करा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

किटक असो वा जीव सजीव
पशुपक्ष्यांवर प्रेम करा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

कागद, कापड, धातु, निर्मिती
खडक, मातीचाही उपयोग करा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

असो बाल, तरुण, म्हातारपण
दोंगरदर्‍या मुक्त फिरा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
ऋतु बदलाचा खेळ सारा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

जीवन आपले आनंदाने जगा
एकदाच मिळते विचार करा
निसर्ग आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद करा

- अमित सुतार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची