Loading ...

नंदीबैल आला - मराठी कविता (सुरेश सावंत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी सुरेश सावंत (डॉ. सुरेश गोविंदराव सावंत) यांची नंदीबैल आला ही लोकप्रिय मराठी कविता.

नंदीबैल आला - मराठी कविता (सुरेश सावंत)

नंदीबैल आला आता नंदीबैल आला, हसवितो, खेळवितो बालगोपाळाला


नंदीबैल आला - मराठी कविता (सुरेश सावंत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी सुरेश सावंत (डॉ. सुरेश गोविंदराव सावंत) यांची नंदीबैल आला ही लोकप्रिय मराठी कविता.



नंदीबैल आला आता नंदीबैल आला
हसवितो, खेळवितो बालगोपाळाला

लाल गुलाबी मखमालीची अंगावरती झूल
जगावेगळे रूप बघूनी जिवास पडते भूल
गुबूगुबूच्या तालावरती गाव गोळा झाला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला

रंगबिरंगी सारे सजले उभे रेखीव शिंग
चमचम चमके भाळावरती चमकदार भिंग
प्रश्न कुणाचा असो कसाही डुलवी मानेला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला

किणकिण किणकिण गळ्यात घुंगुरमाळा
छुमछुम छुमछुम साथ देतसे पायी पैंजणवाळा
पाठीवरच्या गोणीचेही नाही ओझे त्याला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला

घराघरांतून सूप भरूनी येती दाणे, नाणे
वेगवेगळ्या दारावरती वेगवेगळे गाणे
दाणे देईल त्याचे गाणे गाई नंदीवाला
नंदीबैल आला आता नंदीबैल आला

- सुरेश सावंत (डॉ. सुरेश गोविंदराव सावंत)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची