Loading ...
/* Dont copy */

माझा प्रिय एकांत (मराठी कविता)

माझा प्रिय एकांत (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी विजय पाटील यांची माझा प्रिय एकांत ही मराठी कविता.

माझा प्रिय एकांत (मराठी कविता)

असाच एकदा बसलो होतो निवांत, सोबत मंद जळणारी पणतीची वात...


माझा प्रिय एकांत (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘विजय पाटील’ यांची ‘माझा प्रिय एकांत’ ही मराठी कविता.



असाच एकदा बसलो होतो निवांत
सोबत मंद जळणारी पणतीची वात
मधूनच येत होता वार्‍याचा झोत
काहीशे उडत होते धुळीचेही लोट

नकळत हृदयी उमलला होता हर्ष
जणु प्रेयसीचा तो नाजूकसा स्पर्श
अनुभवता हा काळ वर्षानुवर्ष
तया यामध्ये जाणवला जीवनाचा उत्कर्ष

अचानक झाला वारा विराट
अन्‌ विझली पणती एका क्षणात
पांढर्‍या रंगाने उडाला धूर रेषेत
अंधाराने घेतला प्रकाश कवेत

पसरली काळ्याकुट अंधाराची रात
जाणवू लागली मग थंडीचीही लाट
मन सैरभैर सुटलं धावत
अन्‌ विचारांच थैमान नव्हतं थांबत

मग भावनेच्या भरात एक केली करामत
उभी केली ही काव्याची इमारत
जसे पाण्याचे अस्तित्व काळ्याभोर मेघात
तसा मी अन्‌ माझा प्रिय एकांत


माझा प्रिय एकांत (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- विजय पाटील

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची