Loading ...

नदीचे गाणे - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) यांची नदीचे गाणे ही लोकप्रिय मराठी कविता.

नदीचे गाणे - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

दरीदरीतुन, वनावनातुन. झुळझुळ मी वाहत येते


नदीचे गाणे - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) यांची नदीचे गाणे ही लोकप्रिय मराठी कविता.



दरीदरीतुन, वनावनातुन
झुळझुळ मी वाहत येते
मी मंजुळ गाणे गाते
मी पुढेच धावत जाते

वसली गावे तीरावरती
त्यांना भेटुनि जाते पुढती,
लतावृक्ष किती काठावरती
भूमितुनी जे मला भेटती

फुलवेली मज सुमने देती
कुठे लव्हाळी खेळत बसती
कुठे आम्रतरू माझ्यावरती
शीतल अपुली छाया धरती

पाणी पिउनी पक्षी जाती
घट भरुनी कोणी जल नेती
गुरे-वासरे जवळी येती
मुले खेळती लाटांवरती

मी कोणाची, मी सर्वांची
बांधुनिही मज नेणाऱ्यांची
जेथे जाईन, तेथे फुलवीन
बाग मनोहर आनंदाची

- वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

अभिप्राय

  1. मेराजुरी सुबक साजरी गाव बहू सुंदर देव दयेने दयाळू राजे इचलकरंजी कर
    पाठविणे ही विनंती

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची