Loading ...

श्रीमहाराष्ट्रगीत - मराठी कविता (गोविंदाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांची श्रीमहाराष्ट्रगीत ही लोकप्रिय मराठी कविता.

श्रीमहाराष्ट्रगीत - मराठी कविता (गोविंदाग्रज)

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा


श्रीमहाराष्ट्रगीत - मराठी कविता (गोविंदाग्रज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांची श्रीमहाराष्ट्रगीत ही लोकप्रिय मराठी कविता.



मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन, कांचन, करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी
निशाणावरी
नाचते करी
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्थासी
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्रदेशा

अपर सिंधुच्या भव्य बांधवा! महाराष्ट्रदेशा
सह्याद्रीच्या सख्या! जिवलगा! महाराष्ट्रदेशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी

भिन्न वृतिची भिन्न भिन्न ही एक जीवसत्वें
तुझिया देही प्रकट दाविती दिव्य जीवतत्वे
चित्पावन बुध्दीने करिसी तू कर्तबगारी
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी
कायस्थाचे इमान फिरवी रक्ताचा फेर
ठाक मराठी मनगट दावी तुझे हाडपेर
ध्येय जे तुझ्या अंतरी

ठायी ठायी पांडवलेणी सह्याद्रीपोटी
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठी
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिचाही
लढवय्या झुंझार डोंगरी तूच सख्या पाही
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल
ध्येय जे तुझ्या अंतरी

तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा
वहाण पायी अंगि कांबळी उशाखालि धोंडा
विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात
इकडे कर्णाटक हासतसे, तिकडे गुजरात
आणि मराठी भाला घेई दख्खन् - कंगाल
तिकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल
ध्येय जे तुझ्या अंतरी

रायगडावर माय जिवाची गवळण बिनधोक
झोक हिरकणी नाव ठेवुनी जाइ रोखठोक
करीत पावन अर्पुनि पंचप्राणांचा पिंड
हिरडस-मावळचा श्रीबाजी, ती पावनखिंड
करी रायगड रायरिचा तो जिजाइचा तान्हा
कोंढाण्याचा करी सिंहगड मालुसरा तान्हा
ध्येय जे तुझ्या अंतरी

रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला
पहिलावहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्या देशा
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा
वाल्मीकीचे शतकोटी यश विष्णुदास नामा
ध्येय जे तुझ्या अंतरी

मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा
कवि कृष्णाच्या निर्यमका हे महाराष्ट्र देशा
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुध्दीचा मेळ
जिथे रंगली साधीभोळी जनाइची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी
ध्येय जे तुझ्या अंतरी

विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी
तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी
उभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी
ध्येय जे तुझ्या अंतरी

प्रभाकराची जडणघडण कडकडित म्हणायाला
दो हातांचा मुजरा माझा तुळशीरामाला
भीमथडीहुनि चहुमुलखांवर फिरले धारकरी
भीमथडीवर चहुंमुलखांतुनि जमले वारकरी
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धाव
पुंडलिकाचे नाव चालवी दगडाची नाव
बोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊ लाख
ध्येय जे तुझ्या अंतरी

- गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची