Loading ...
/* Dont copy */

बिकट वाट वहिवाट - मराठी कविता (अनंत फंदी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी अनंत फंदी (अनंत भवानीबावा घोलप) यांची बिकट वाट वहिवाट ही लोकप्रिय मराठी कविता.

बिकट वाट वहिवाट - मराठी कविता (अनंत फंदी)

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको...


बिकट वाट वहिवाट - मराठी कविता (अनंत फंदी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी अनंत फंदी (अनंत घोलप) यांची बिकट वाट वहिवाट ही लोकप्रिय मराठी कविता.



बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐसा आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तिकपणि तू शिरुनी जनाचा, बोल आपणा घेऊ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापावर रुसू नको
दुर्मुखलेला असू नको
व्यवहारामंधी फसू नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शहाणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहु नको
एकाहुनी चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपेश माथा घेउ नको
उणी तराजू तोलू नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तू मागु नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहु नको

उगीच निंदा स्तुती कुणाची, स्वहितासाठी करु नको
बरी खुशामत शाहण्याची, परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजी-भाकरी, तूपसाखरे चोरु नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधि विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तू टाकू नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरु नको
द्वैताला अनुसरु नको
हरिभजना विस्मरु नको
सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको

- अनंत फंदी (अनंत घोलप)

अभिप्राय

  1. डॉ.. संतोष खेडलेकर, संगमनेर०१ ऑक्टोबर, २०२३

    कवी अनंत फंदी यांच्या वडिलांचे नांव कुठेही उपलब्ध नाहीये. भवानी बाबा हे त्यांचे गुरू होते. कृपया दुरुस्ती करावी ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
      आपल्या सुचनेनुसार आम्ही सदर दुरूस्ती केली आहे.

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची