Loading ...
/* Dont copy */

बाई मी धरण बांधिते - मराठी कविता (दया पवार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी दया पवार यांची बाई मी धरण बांधिते ही लोकप्रिय मराठी कविता (व्हिडिओसह).

बाई मी धरण बांधिते - मराठी कविता (दया पवार)

बाई मी धरण, धरण बांधिते गं


बाई मी धरण बांधिते - मराठी कविता (दया पवार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी दया पवार यांची बाई मी धरण बांधिते ही लोकप्रिय मराठी कविता.



बाई मी धरण, धरण बांधिते गं
माझं मरण, मरण कांडिते गं

झुंजूमुंजू गं झालं,
पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा गं
कोंडा मी रांधिते

दिस कासऱ्‍याला आला
जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरू
लेकरू पाटीखाली मी डालते

काय सांगू उन्हाच्या झळा
घाव घालीत फुटे शिळा
कड दाटे कड दाटे
पायी पाला मी बांधिते

पेरापेरात साखर
तुमचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी
सारं रान धुंडाळिते

वेल मांडवाला चढे
माझ्या घामाचे गं अळे
माझ्या अंगणी
अंगणी पाचोळा गं पडे


बाई मी धरण बांधिते - मराठी कविता (दया पवार) - (व्हिडिओ)



- दया पवार

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची