Loading ...

पोटचा गोळा (मराठी कविता)

पोटचा गोळा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गुरुदत्त पोतदार यांची पोटचा गोळा ही कविता.

पोटचा गोळा (मराठी कविता)

पोटच्या गोळ्याला दारातच सोडलं अन्‌, हातावरचं पोट भरायला काळीज उन्हात धावलं


पोटचा गोळा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गुरुदत्त पोतदार यांची कविता ‘पोटचा गोळा’.



पोटच्या गोळ्याला दारातच सोडलं अन्‌,
हातावरचं पोट भरायला काळीज उन्हात धावलं

उन्हातान्हात घाम गाळून निम्मं काम सरलं,
तान्ह्याच्या आठवणींचं गुराळ पोटातच मुरलं

भाकरीतुकडा खाता खाता पोरगं कानांत रडलं,
लागलीच घेऊन येते म्हणून काळीज आतनं वरडलं

ईतभर खळगी भरण्यात वेचलं आयुष्य सारं,
पोरगं शिकून श्यान मोठा हाफीसर हुईल रं

पोरगं धाडलं शाळला घेतलं नवं पुस्तक दप्तर,
धन्याच्या डोईवर पडलं घरचं मोठं खापर

एक एक म्हणत सरल्या साऱ्या येत्या,
घरचं कल्याण करणाऱ्या आठवणी मनात मात्र हुत्या

आता काही मनात आस नाही रं राहिली,
माझ्या हाफीसरला नवी बाहुली पहिली

दिवस सरलं, कष्ट हारलं नातवासनी खेळवताना,
खचलं आमचं मन, तुमचं तुमी बघा ऐकताना

काळानं घात केला, मेला सगळा लळा,
पोटच्याच गोळ्याला राहिला नाही कसलाच कळवळा,
कसलाच कळवळा

- गुरुदत्त पोतदार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची