Loading ...
/* Dont copy */

माझी होशील ना (मराठी कविता)

माझी होशील ना (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अल्केश जाधव यांची माझी होशील ना ही कविता.

माझी होशील ना (मराठी कविता)

चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना?, सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?


माझी होशील ना (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अल्केश जाधव यांची कविता ‘माझी होशील ना’.



बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय
मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय
चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

अंगी झोंबे हा गार गार वारा
मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा
उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

सखे, सुरू झालाय आता वीजांचा कडकडाट
हिरवी होईल धरती अन् ओली चिंब पायवाट
थोडी सावरत अन् बावरत, हात माझा हाती घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

धुंद कुंद ओल्या क्षणी, येऊ दे आता प्रेमाला बहर
तप्त धरणीच्या मिलनासाठी ‘तो’ ही करेल कहर
त्याच्यासारखीच मिलनाची ओढ, तुला देखील लागेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

निसर्गाच्या अमृतधारांनी, मन न्हाऊन निघतंय
आठवणींच्या हिंदोळ्यावर, उगाच झुलत राहतंय
पुरे झाल्या आठवणी, आता सामोरी तू येशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

ऊन-पावसाच्या लपंडावात, बघ इंद्रधनुही साकारले
सप्तरंगांच्या या खेळात, झाले तुझेही मन बावरे
बावऱ्या तुझ्या या मनात, प्रेमाची पालवी फुटेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

बरसू दे त्याला मनासारखं, आपण मात्र एकांत शोधूया
आडोशाला उभे राहून, एकमेकांच्या मिठीत विसावूया
गोऱ्या गालावरून थेंब ओघळताच, लाजून हसशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

तसा आत खोलवर पाऊस, माझ्यावर रोजच बरसतो आहे
डोळ्यांतील आसवांसवे, नित्य ओघळतो आहे
उधाणलेल्या माझ्या मनाला, तुझा किनारा देशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

- अल्केश जाधव

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची