Loading ...

माझी अर्धांगिनी तू (मराठी कविता)

माझी अर्धांगिनी तू (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची माझी अर्धांगिनी तू ही कविता.

माझी अर्धांगिनी तू (मराठी कविता)

किती ही भांडलो रतू, पण तुझ्याईना मला करमेना


माझी अर्धांगिनी तू (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘रतू’.



किती ही भांडलो रतू
पण तुझ्याईना मला करमेना
लाख मोलाची तू गं राणी माझी
तुझी तुलना मला येईना

माझी अर्धांगिनी असून तरी
तुला पाहतच उभं रहावं
कधी तुला मी रागवतो रतू
तू प्रेमानंदाचा वर्षाव

बघ गं आरशाकडे रतू
त्याला पण तुझ्याईना करमेना
तुझा नामाचा मंत्र म्हणू मी
स्वप्नात पण जीवाला करमेना

नटून थटून सजलेली रतू
रंग बहरूनी आले
नजराची नियत खराब ही
मन लहरूनी आले

रातराणीचा गंध रतू
तो गंध मला भावेना
तू थोडी दूर का गेली
तूच हृदयाला भावेना

दोन चिमुकले गोड रतू
लाडके दिले तू जीवनात
असचं जीवन बहरून रहावं
एक दुसर्‍याच्या प्रेमात

राम चकोर गं लेक रतू
हृदयाचे तारा आंगना
त्यांची तुझी एकूनी गोष्टी
मनातले व्यक्त सारे भावना

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची