Loading ...

अंकुरलेली कविता (मराठी कविता)

अंकुरलेली कविता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी हेमंत सावळे यांची कविता अंकुरलेली कविता.

अंकुरलेली कविता (मराठी कविता)

हजारो वर्षानंतर ही पृथ्वी उध्वस्त होईल, इथल्या संस्कृत्या गाडल्या जातील


अंकुरलेली कविता (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी हेमंत सावळे यांची कविता ‘अंकुरलेली कविता’.



हजारो वर्षानंतर ही पृथ्वी उध्वस्त होईल
इथल्या संस्कृत्या गाडल्या जातील
पुसट होतील पाऊलखुणा
पण कविता नाही मरणार
अमरत्व घेवून तेव्हाही ती उभी राहिल मुळासकट

पृथ्वीचे तुकडे होऊन ते विखुरतील ब्रम्हांडात
तरीही मी कविता लिहणार कवितेत लिहणार
इथली अराजकता बलात्काराला पोटूशी घालणारी व्यवस्था
सांडासारखे माजलेले सत्ताधारी
आणि लाळ गाळत फिरणारी पत्रकारिता
पोरं बाळ भविष्याच्या घोरात जळत असताना
चामडी वाचवण्यासाठी बिळात लपलेल्या
माणसाची लाचारी

कवितेने फिर्याद करावी कोणाकडे?
कश्यासाठी?
खायाचे दात लपवणाऱ्या माणसाला
कवितेने नागडं करावं
मुस्कटदाबीला द्यावं जोरदार प्रत्युत्तर
क्रांतीच्या पालव्या अंकुराव्या सर्वदूर
इतिहासाला बळ देऊन
मैदानात ठाकावं उभं
तलवारी उपसायच्या आधीचं
कवितेनं शांतीदूत व्हावं व्हांव
न्यायप्रिय आणि बलशाली

समूळ नष्ट होण्याच्या आधीच
कवितेने अवघं विश्व अंकुरावं...!

- हेमंत सावळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची