Loading ...

आप्पांना झालाय स्मृतीभंशाचा आजार

आप्पांना झालाय स्मृतीभंशाचा आजार - वयोपरत्वे होणाऱ्या या आजाराविषयी जागरुकता पसरवण्याचा मालिकेतून प्रयत्न.

आप्पांना झालाय स्मृतीभंशाचा आजार

आई कुठे काय करते मालिकेतील आप्पांना स्मृतीभंशाचा आजार!


आप्पांना झालाय स्मृतीभंशाचा आजार

वयोपरत्वे होणाऱ्या या आजाराविषयी जागरुकता पसरवण्याचा मालिकेतून प्रयत्न.


स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच आप्पा गायब झाल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. आप्पा नेमके गेले कुठे ही चिंता घरच्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही सतावत होती.

विमलमुळे आप्पांचा शोध लागला खरा, मात्र आप्पा एकाएकी गायब होण्यामागचं कारण शोधत असतानाच आप्पांच्या आजाराविषयी घरच्यांना माहित झालं. आप्पांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतीभंश झाल्याचं निदान झालं आहे. ८० वर्षांवरील ५ जणांपैकी प्रत्येकी एकाला हा आजार होतो.

आप्पांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोलेंसाठी हे एक नवं आव्हान आहे. मालिकेतल्या या वळणाविषयी सांगताना किशोर महाबोले म्हणाले, ‘मालिकेतला हा प्रसंग साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागतोय. सुरुवातीला या आजाराविषयी किरकोळ वाचनात आलं होतं.

यासोबतच एखादी व्यक्ती हरवल्याच्या बातम्याही कानावर पडल्या होत्या. आप्पांना झालेला हा आजार साकारताना आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टींचा मला उपयोग झाला. मालिकेत खूप आधीपासून आप्पांच्या विस्मरणाचे प्रसंग पेरण्यात आले होते. मात्र आप्पा घरातून गायब झाल्यावर त्यांचा शोध घेतल्यानंतर या आजाराची कुटुंबियांना तीव्रतेने जाणीव झाली.

औषधोपचारासोबतच कुटुंबाची खंबीर साथ या आजारातून बाहेर काढू शकते. आई कुठे काय करते मालिकेतून स्मृतीभंश या आजाराविषयी जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न आहे. मला प्रेक्षकांच्याही खूप प्रतिक्रिया येत आहेत.’ अरुंधतीच्या आजवरच्या प्रवासात आप्पा तिच्यासोबत सावली प्रमाणे उभे राहिले आहेत.

आप्पांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी आता अरुंधतीला कंबर कसावी लागणार आहे. या सर्वात तिचं करिअर आणि तिचं आयुष्य पुन्हा एकदा पणाला लागणार आहे. आजवर अरुंधतीने कुटुंबासाठी नेहमीच त्याग केला आहे. आप्पांना या आजारपणातून अरुंधती कशी बाहेर काढणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी पाहायला विसरु नका आई कुठे काय करते सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची