Loading ...
/* Dont copy */

माझ्या सोबतीला (मराठी गझल)

माझ्या सोबतीला (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार सुहास बोकरे यांची माझ्या सोबतीला ही मराठी गझल.

माझ्या सोबतीला (मराठी गझल)

सारा विखूरलेला आकांत सोबतीला, मारायला मनाला एकांत सोबतीला


माझ्या सोबतीला (मराठी गझल)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार ‘सुहास बोकरे’ यांची माझ्या सोबतीला ही मराठी गझल.


सारा विखूरलेला आकांत सोबतीला
मारायला मनाला एकांत सोबतीला

गर्दीत आसवांच्या उठबैस आठवांची
चित्रास हार त्यांच्या मरणांत सोबतीला

रात्रीस मेघ आले तारांगणात माझ्या
येणार चांदण्यांचा परप्रांत सोबतीला

माझ्या रणांगणी त्या गाथा विदूषकांच्या
आधार हाच खोटा धादांत सोबतीला

वारी खुशाल देते आव्हान पोचण्याचे
त्या पालखीत आता विश्रांत सोबतीला

का गूढ हासतो मी पडलीच भ्रांत आहे
हास्यात ताण माझे ते शांत सोबतीला

रस्साकशीत ह्यांच्या प्रेमास बोलवावे
आकाश साथ माझ्या सीमांत सोबतीला

- सुहास बोकरे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची