Loading ...

व्यथा भूमीपुत्राची - मराठी कविता

व्यथा भूमीपुत्राची, मराठी कविता - [Vyatha Bhumiputrachi, Marathi Kavita] काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हॉटेल, गोकुळ कुंभार यांची सामाजिक कविता.

व्यथा भूमीपुत्राची - मराठी कविता | Vyatha Bhumiputrachi - Marathi Kavita

काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हॉटेल, काय ते आमचे मंत्री आहेत मस्त


व्यथा भूमीपुत्राची (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची सामाजिक कविता ‘व्यथा भूमीपुत्राची’.



काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हॉटेल, काय ते आमचे मंत्री
आहेत मस्त
त्यांच्या बातम्या ऐकत रानात आहे मी व्यस्त

मी शेतकरी आहे साहेब
असल्या व्यथा मांडायला माझं उघडत नाही तोंड
खताच्या किंमती जरी वाढल्या तरी करतो का कधी बंड

स्वतः पिकवलेल्या अन्नाचा खाता येत नाही घास
पोरीच्या लग्नाला काढलेल्या कर्जाचा हप्ता भरता भरता
गुदमरतोय ओ माझा श्वास

सरकारच्या योजना लय आल्यात
त्यातली उज्ज्वला जरा भारीच वाटली
गॅस महागला तेव्हा मात्र मातीची चुलंच परवडली

राजकारण्यासारखं निसर्ग बदलतोय
कधी दुष्काळ तर कधी पुर येतोय
नोकरदार माणूस मात्र ५ रु. जुडी घेताना घाम रुमालानं पुसतोय

व्यापारी खातोय मलिदा
मरतो मी उपाशी ज्याला तुम्ही म्हणता हाच तो
आमच्या जगाचा पोशिंदा

निसर्ग आता पहिल्यासारखी साथ देईना
राब राब राबून पैसे जमतोय
पोरगं शाळेची फी मागतंय
इथ बियांना पैसे पुरेना
माझं दुःख सरकार तर राहुद्या शाळासुध्दा समजेना

मग घ्यावा लागतो कर्जाचा आधार
कर्ज पण मोबाईलच्या इंटरनेटच्या स्पीडने वाढत जातंय फास्ट
स्वाभिमानानं जगण्याची सवय म्हणून करतोय काबाडकष्ट

कर्ज न फेडता पळून जाण्याची होत नाही हिंमत
म्हणून तर तुम्ही बघत आहात माझ्या कुटुंबाची गंमत

अहो भष्ट्राचार करणारे थंड हवेत आहेत सुस्त
मग मीच का घेऊ कर्जापायी फासी
एवढा आहे का माझा जीव माझ्या शेतमालासारखा स्वस्त

तरीही सांगतो माझा भारत देश आहे कृषीप्रधान
कुणी विचारलं कि काय करता तुम्ही शेती करतोय सांगताना
कंठाशी येतो माझा प्राण

तरीही काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हॉटेल मध्ये आमचे
मंत्रीसाहेब आहेत मस्त
मी मात्र बातम्या ऐकत शेताच्या साऱ्यात आहे व्यस्त

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची