Loading ...
/* Dont copy */

श्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)

श्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

श्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘गणपती’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट...

श्री गजाननाचा जन्म

मराठीमाती संपादक मंडळ

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘गजानन’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.

शंकर-पार्वती कैलासावर वास्तव्य करत असताना पार्वतीने एकदा शंकराकडे आपल्याला पुत्र हवा असा हट्ट धरला. ती शंकराला म्हणाली की निदान कैलास सोडून गेलेला माझा कार्तिकेय तरी शोधून आणा. पार्वतीचा हट्ट पुरविण्यासाठी शंकर कार्तिकेयास आणण्यास गेले. पण पार्वतीला पुत्रवियोग सहन होईना. म्हणून इकडे पार्वतीने एक मातीचा बाहुला तयार केला आणि ती त्याच्याशी खेळू लागली.

पार्वती म्हणजे साक्षात आदिमाया जगदंबाच! तर या जगदंबेला संतुष्ट करण्याची ही उत्तम संधी मानून श्रीविष्णूने यामातीच्या बाहुल्यात प्रवेश केला आणि बाहुला जिवंत झाला! विष्णू पार्वतीचा पुत्र झाला! इकडे शंकर कार्तिकेयाला घेऊन परत आले. तेव्हा त्यांना ही सर्व हकीकत समजली. त्यांना खूप आनंद झाला. हळूहळू पार्वतीला या पुत्राची गोष्ट सर्वांना कळली. त्याला पाहण्यासाठी सर्व देव कैलासावर येऊन गेले.

त्यात शनीदेवसुद्धा आला. पण तो आपले डोळे उघडेना. आपली दृष्टी पडल्यास काहीतरी विपरीत घडेल अशी भीती त्याला वाटत होती. पण पार्वतीने ‘येथे सर्व मंगल आहे’ असे म्हणून त्याला डोळे उघडण्याचा आग्रह केला. तेव्हा अखेर शनीने डोळे उघडून पाहिले. त्याबरोबर एका क्षणात त्या पुत्राचे मस्तक उडून गेले. कैलासावर एकच कोलाहल झाला.

पार्वतीने आक्रोश सुरु केला. शंकराने आपल्याला गणांना मस्तक शोधण्यासाठी पाठविले. पण ते शीर काही सापडेना. शेवटी शंकराने आपल्या गणांना आज्ञा दिली, ‘दक्षिणेकडे पाय करुन जो प्राणी झोपला असेल त्याचे डोके कापून आणा.’ मग गण बाहेर शोध घ्यायला निघाले. शोधता शोधता गणांना एक हत्ती दक्षिणेकडे पाय करुन झोपलेला दिसला. त्याचेच मस्तक कापून ते शंकराकडे घेऊन आले. मग शंकराने हेच मस्तक त्या शिरविरहीत पुत्राच्या देहावर ठेवले आणि पार्वतीपुत्र पुनः आपल्या मंत्रसामर्थ्याने जिवंत केले.

हत्तीचे मस्तक पुत्राल मिळाले म्हणून शंकर-पार्वतीचा हा पुत्र ‘गजवदन’ झाला. गज म्हणजे हत्ती. आनन म्हणजे तोंड, गजाचे आनन म्हणजे गजानन. शंकराने गजाननाला गणांचा अधिपती केल्यामुळे तो ‘गणपती’ झाला.

‘श्री गजाननाचा जन्म’ या संबंधी इतर गणपतीच्या गोष्टी वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची