Loading ...
/* Dont copy */

स्त्री चाळीशीनंतरचे आजार - आरोग्य (के के दाते)

स्त्री चाळीशीनंतरचे आजार - स्त्रीस ग्रासणाऱ्या चाळीशीनंतरच्या आजारांची माहिती व उपायांबद्दल सखोल माहिती देणारा ब्रिगेडियर डॉ. के. के. दाते यांचा लेख.

स्त्री चाळीशीनंतरचे आजार - आरोग्य (के के दाते)

चाळीशीनंतर स्त्रिया विविध आजारांचे भक्ष्य ठरतात


स्त्री चाळीशीनंतरचे आजार - आरोग्य (के के दाते)

चाळीशीनंतर बऱ्याच स्त्रिया हृदयाचे रोग, ब्लड प्रेशरचे विकार, डायबिटीस, जुने फुफ्फुसाचे विकार, संधिवात इत्यादी रोगाचे भक्ष्य बनतात.

Article for Diseases in Women after Forty.चाळीशीनंतर बऱ्याच स्त्रिया हृदयाचे रोग, ब्लड प्रेशरचे विकार, डायबिटीस, जुने फुफ्फुसाचे विकार, संधिवात इत्यादी रोगाचे भक्ष्य बनतात. यापैकी पहिले चार रोग महत्त्वाचे असल्याने त्याचे विवेचन या लेखात केले आहे. योय काळजी घेतल्यास या रोगांची तीव्रता कमी करता येते किंवा रोग होणे वाचविता येतो.

हृदयाचे विकार (Ischemic Coronary Heart Disease)


१९५० साली एकूण मृत्यूच्या कारणांमध्ये या रोगाचा क्रमांक सहावा लागत होता. तर १९६० साली त्याचाच क्रमांक तिसरा लागत होता. अर्थात क्षय अथवा जंतूंचा प्रादुर्भाव यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हृदयाच्या रोगापेक्षा जास्त होते. काही काळातच त्याचा पहिला क्रमांक लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हृदयाच्या विकारांचे अनेक प्रकार आहेत. परंतु त्यातील प्रमुख

१) अंजायना पेक्टोरिस (Angina pectoris)
२) हार्ट अटॅक (Heart attack)

हृदयाच्या रोगांची कारणे अनेक असली तरी सामान्य कारणे खालील प्रमाणे असतात.

(अ) ताबा नसलेली कारणे: लिंग, वय व आनुवंशिकता.
(ब) ताब्यात ठेवता येणारी कारणे:

  • मानसिक ताण
  • आहार: जास्त आहार, सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ, अतिशुद्ध साखर, सडून सवच्छ केलेली धान्य.
  • मधुमेह
  • बैठे काम, व्यायाम न करणे
  • अति जास्त रक्तदाब
  • स्थूलता
  • धूम्रपान

अंजायना पेक्टोरिस


अंजायनाचा अ‍टॅक हा ऑक्सिजनचा हृदयाला होणारा पुरवठा जरुरीपेक्षा कमी झाल्यामुळे होतो. यात होणारी तीव्र वेदना ही छातीवर दाब दिल्यासारखी, आवळल्यासारखी किंवा कापल्यासारखी असून छातीच्या मध्यभागाकडून सामान्यपणे डाव्या खांद्याकडे किंवा हाताकडे जाते. हा अ‍टॅक मानसिक ताण किंवा शारीरिक श्रम चालू असताना येतो. नायट्रोग्लीसरीन या औषधांनी हा अ‍टॅक जातोसुद्धा. सर्वसामान्यपणे हा अ‍टॅक २ ते ३ मिनिटे टिकतो व वेदनेच्या तीव्रतेमुळे मनुष्यास त्याचे श्रम थांबवून विश्रांती घ्यावी लागते. या रोगाचे निदान रोगाच्या पूर्व इतिहासावरून व लक्षणावरून करता येते. अ‍टॅकमध्ये जर इ. सी. जी. घेतला तर या रोगाची लक्षणे त्यामध्ये सापडतात. परंतु अ‍टॅक गेल्यावर इ. सी. जी. मधील लक्षणे नाहीशी होतात.

हार्ट अ‍टॅक  (Myocardial Infarction)


हृदयाला होणारा रक्तपुरवठा खूपच कमी झाला किंवा थांबला तर हृदयाच्या स्नायूंना इजा पोहोचते (स्नायू मरतात) अशा तऱ्हेच्या स्नायूच्या इजेला हार्ट अ‍टॅक किंवा मायोकार्डीयल इन्फ्रॅक्शन असे म्हणतात. हार्ट अ‍टॅकमध्ये होणारी वेदनाही अंजायनापेक्षा खूपच तीव्र असते व खूप वेळ टिकते. (दोन तासांपेक्षा जास्त वेळ.) वेदनेचे स्थान छातीच्या मध्ये अंजायनाप्रमाणेच असते व वेदना डाव्या कुशीकडे व छातीकडे जाते. या वेदनेबरोबर उलटी होणे, दम लागणे, खूप घाम येणे व अत्यंत अशक्तपणा वाटणे अशी लक्षणे असतात. छातीत कळ न येता (वेदना न होता) हार्ट अ‍टॅक होऊ शकतो, त्यास सायलेंट हार्ट अ‍टॅक असं म्हणतात. त्याचे निदान कार्डिओग्रॅमवरून रक्तातील इन्झाईम्स तपासून करता येते.

५० ते ६० टक्के मृत्यू हार्ट अ‍टॅकनंतर पहिल्या काही तासात होतात. म्हणून हार्ट अ‍टॅकच्या रुग्णाला अ‍ॅब्यूलन्समधून इन्टेंसिव्ह कार्डिअ‍ॅक केअर युनिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवावे. इन्टेंसिव्ह कार्डिअ‍ॅक केअर युनिटमध्ये हृदयाच्या स्पंदनाची पूर्णतः व सारखी तपासणी कार्डिओस्कोप नावाच्या उपकरणाने करता येते; तसेच काही बदल घडत असेल तर त्यावर उपायही लगेच करण्याची सोय उपलब्ध असते. कार्डीअ‍ॅक केअर युनिटच्या सोयीमुळे मृत्यूचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे.

हृदयाचे दुखणे होऊ नये म्हणून काय करावे?


(१) वेळोवेळी योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक स्त्री-पुरुष या प्राणघातक रोगाशी योग्य मुकाबला करू शकतो.

(२) हृदयाच्या रोगाचा इतिहास अनुवंशिकतेमध्ये मिळाल्यास प्रथमपासूनच जास्त वजन वाढू न देणे, धूम्रपान न करणे, मद्य किंवा जास्त प्रमाणात आहार न घेणे, स्निग्ध पदार्थ किंवा साखर जास्त प्रमाणात न घेणे ह्या काळज्या घ्याव्यात. याउलट ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये, तसच जास्त प्रमाणात तंतू असलेली (न पचता शिल्लक राहणारा भाग) कडधान्ये, भाजीपाला व फळे आहारात घ्यावीत. तसेच रोज नियमित व्यायाम करावा. रोज ४५ ते ५० मिनिटे भरभर चालणे, शवासनासारखी योगासने करावीत.

जर एखाद्यास आपल्या हृदयाची स्थिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर ब्लड प्रेशर, ई.सी.जी., छातीचा एक्स रे, रक्तामधील कॉलेस्टेरॉल, ट्राय ग्लिसराईड यासारख्या तपासण्या करून घ्याव्यात. यामध्ये काही प्रमाणात दोष आढळल्यास तो नाहीसा करण्यासाठी आहार-विहारात बदल व वर नमूद केलेली कारणे न घडवून देणं हे महत्त्वाचं ठरेल.

ब्लडप्रेशर हायपरटेंशन


वयाबरोबर ब्लडप्रेशरही वाढत जातं हा समज सर्वसामान्यपणे आढळतो. परंतु वयाबरोबर वाढत जाणाऱ्या ब्लडप्रेशरसाठी तपासण्या व उपचार न करणं ही चूक आहे; कारण कोणत्याही वयात वाढणाऱ्या ब्लडप्रेशरपासून अपंगता किंवा मृत्यू याचा धोका हा असतोच. जास्त ब्लडप्रेशर असणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णात त्याचं कारण आढळून येत नाही, म्हणून त्याला प्राथमिक कारण नसलेले हायपरटेंशन असं म्हणतात. अनुवंशिकता, जास्त वजन असणं, जास्त प्रमाणात मिठाचं व स्निग्ध पदार्थाचं सेवन, धुम्रपानाची सवय, डायबेटीस अशी कारणं ब्लडप्रेशर जास्त वाढण्यास कारणीभूत असतात. सामान्यतः ३५ ते ४० वयापासून हा रोग आढळतो. प्रत्येक वेळी वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे काही लक्षणे निर्माण होतीलच असं नसल्यामुळं बऱ्याच रुग्णांना त्यांचं ब्लडप्रेशर वाढलेले आहे याची कल्पनाच नसते. परंतु सामान्यतः डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तता वाटणे, विसरभोळेपणा, एखाद्या गोष्टीवर एकाग्रचित्त न होणं, त्रासिकपणा, छातीत धडधड होणं, नाकातून रक्तस्त्राव होणं अशी लक्षणे असतात.

वाढलेल्या ब्लडप्रेशरमुळे मेंदूच्या, डोळ्याच्या, हृदयाच्या, मूत्रपिंडाच्या तसंच हातापायाच्या रक्तवाहिन्यामध्ये कायमचा फरक पडतो. या फरकामुळेच अर्धांग, आंधळेपणा, हृदयाचे रोग, हृदयाचा आकार वाढणे, मूत्रपिंडाचे विकार निर्माण होतात. परंतु अशा तऱ्हेचे रक्तवाहिनीत निर्माण होणारे बदल अगदी प्रथम अवस्थेमध्ये वाढलेले ब्लडप्रेशर ओळखून योग्य उपाययोजना केल्यास थांबू शकतात. या विज्ञानयुगात वाढलेलं ब्लडप्रेशर अगदी थोडं असो किंवा खूपच जास्त प्रमाणत असो, योग्य औषधोपचारांनी आटोक्यात येऊ शकतं. या उपायांचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी लवकरात लवकर वाढलेलं ब्लडप्रेशर ओळखणं व लगेचच उपाययोजना करणे अत्यंत अगत्याचं ठरतं. उपायांनी ब्लडप्रेशर योग्य प्रमाणात आल्यानंतर त्यावरील उपाययोजना सोडून देणं हा खरोखरीच वेंधळेपणा ठरेल. कारण औषधोपचार थांबल्यामुळे ब्लडप्रेशर हळूहळू नकळत वाढत जातं. याचाच अर्थ एवढा औषधोपचार चालू केल्यानंतर ते जवळजवळ जन्मभरच लागतात.

आपण वाढलेल्या ब्लडप्रेशरसाठी काय करू शकतो?


(१) राहणीमानात बदल करणे म्हणजेच, ठराविक वेळ काम करणं, ठराविक वेळी खेळणं, रात्रीची पूर्ण विश्रांती, तसेच आठवड्याचे शेवटी विश्रांती व तापट स्वभावात मूलतः बदल.

(२) मानसिक शांतता ही शारीरिक शांततेइतकीच महत्त्वाची आहे. योगातील शवासन मन व शरीर या दोन्हीवरील ताण कमी करण्यास योग्य आहे. (एवढ्या एवढ्या कारणांनी स्त्रीची घरात चिडचिड सुरू होते, अशावेळी घरातल्या इतरांनी तिला समजून घेतलं पाहिजे. वाढत्या वयामुळे तिच्यात हा फरक पडतो.)

(३) आहारातील मीठ कमी करणं. अशामुळे एखादे वेळेस औषधांचीही जरुरी लागणार नाही. याचाच अर्थ जेवतांना मीठ न घेणं, तसेच पापड, चटणी, लोणचं, बंद डब्यातील अन्न, खारे शेंगदाणे, फुटाणे इत्यादी वर्ज्य करावेत.

(४) वजन आटोक्यात आणणं. आटोक्याबाहेरचे वजन असण्याने हृदयावरील जास्त ब्लडप्रेशर असल्यामुळे पडणारा ताण वाढतो.

(५) धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करावं.

(६) वेळोवेळी आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे चालू असलेल्या औषधात बदल करणं किंवा त्याचं प्रमाण कमी जास्त करणं हे सोपं जातं; व त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो.

डायबेटिस


डायबेटिसचं प्रमाण दिवसेंदिवस सर्वच जगात वाढत आहे. आपल्या देशात ते सामान्यपणे २ ते ३ टक्यांपर्यंत आहे. परंतु चाळीशीनंतर याचे प्रमाण जास्त आढळतं.

डायबेटीस होण्याची कारणे


(१) आनुवंशिकता

(२) जास्त लठ्ठपणा: वजन वाढल्यामुळे इन्सुलिनचा विविध पेशींवर होणारा परिणाम कमी होत जातो.

(३) आहार: जास्त साखर खाण्याचं प्रमाण, जास्त शुद्ध पिष्टमय पदार्थ, प्रथिन व कमी प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाणं.

(४) औषधे: कॉर्टिकोस्टेरॉइड्स: कुटुंबनियोजनाच्या तोंडानी घेण्याच्या गोळ्या याचा सातत्याने उपयोग केल्यास रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढतं.

(५) व्हायरस: व्हायरससारख्या अतिसूक्ष्म जंतूच्या प्रादुर्भावामुळे जन्मतः डायबेटिस होऊ शकतो.

(६) गर्भारपण: गर्भारपणामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. परंतु वयाच्या चाळिशीनंतर गर्भारपणाचं प्रमाण फारच अल्प असतं.

रोगनिदान


डायबेटिसचे रोगनिदान लघवीतील व रक्तातील साखरेच्या प्रमाणाच्या तपासणीनंत होऊ शकते.

(१) डायबेटिसमुळे निर्माण होणारी गुंतागुंत
जंतूचा संसर्ग व जखम न भरून येणं या दोन्ही गोष्टी सामान्यपणे या व्यक्तीत आढळतात. स्त्रियांच्यामध्ये बुरशीसारख्या जिवाणूच्या संसर्गानं योनीमार्गाला सूज येऊन त्याठिकाणी खाज सुटणं व अंगावर पांढर जाणे यासारख्या गोष्टी आढळतात.

(२) मज्जातंतूंशी संबंध येणे
अर्धांग, संवेदना बोथट होणं, नैसर्गिक संबंधाची भावना कमी होणं, पिंढऱ्या दुखणं, हातापायांना मुंग्या चावल्यासारखं वाटणं अशी लक्षणं बऱ्याच रुग्णात आढळतात.

(३) हृदय व रक्तवाहिन्या
रक्तवाहिन्यातील बदलामुळे हातापायाचा भाग कुजणं किंवा वाळणं  (Gangrene) ब्लडप्रेशर वाढणे व हृदयाचा रोग होणं.

(४) मूत्रपिंड
मूत्रपिंडाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.

(५) डोळे
अंधुकता येणं, मोतिबिंदू तसंच अंतःपटलामध्ये विकृती निर्माण होणे इत्यादी विकार वरचेवर दिसून येतात.

कुटुंबनियोजन


डायबेटिस असलेल्या स्त्रियांनी कुटुंब नियोजनासाठी तोंडाने घेण्याच्या गोळ्या न वापरता इतर साधने वापरावी.

उपचार


(१) आहार: वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर वजन कमी करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी आहारात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ वापरू नयेत. पिष्टमय पदार्थ वापरताना कमी हातसडीचे तांदूळ, कोंडा व काढलेला गहू यांचा वापर करावा. डाळ, बाजरी, ज्वारी अशा धान्यांचा तसंच मुळा, गाजरासारख्या जमिनीत उगवणाऱ्या भाज्या, कच्चे केळे याचा वापर करावा. टरफलासकट द्विदल धान्य, सालासकट फळे, पालेभाज्या यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यानं त्याचा वापर करावा. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी राहायला मदत होते.

(२) व्यायाम: व्यायामामुळे स्नायूंची ताकद वाढतेच पण त्याचबरोबर इन्सुलिनची शरीरातील गरज कमी होते. नियमित योगासने तसंच एक मैलं भराभर चालणं यामुळे रक्तातील साखर कमी होते. योग्य आहार व नियमित व्यायाम यामुळे बहुसंख्य रुग्णांना इन्सुलिनची इंजेक्शने किंवा डायबेटिसच्या गोळ्या घ्याव्या लागतात. डायबेटिस असलेले रुग्ण डायबेटिसवरील स्वतःचा ताबा, घरीच लघवीची तपासणी करून तपासू शकते.

कोर-पलमोनले


या व्याधीमध्ये फुफ्फुसाच्या आजारामुळे हृदयाचा विकार निर्माण होतो. याचेही दोन प्रकार आहेत.

(१) नुकताच निर्माण झालेला
(२) बरीच जुनी व्याधी

(१) नुकताच निर्माण झालेला: फुफ्फुसांच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकल्यामुळे निर्माण होतो. म्हणून या व्याधीसाठी लागणारा काळ खूपच कमी असतो.

(२) जुनी व्याधी: यामध्ये बराच जुना फुफ्फुसाचा विकार असतो. म्हणून ही व्याधी निर्माण होणेसाठी खूप काळ लागतो.

कारखान्याच्या प्रचंड वाढीमुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत चालली आहे आणि त्यामुळेच जुन्या फुफ्फुसांच्या रोगात वाढ झालेली आहे. उदाहरणार्थ जुना ब्रॉंकायटीस किंवा दमा, त्याचबरोबर धूम्रपान व वरचेवर होणारे फुफ्फुसाचे रोग हेही या रोगाच्या वाढीला कारणीभूत होतात.

हा रोग होऊ नये म्हणुन काय करावे?


(१) जंतूमुळे वरचेवर होणारे संसर्गजन्य रोग टाळावेत. जर झालाच तर ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून औषधपाणी करावं.

(२) प्रदूषित हवा टाळावी, धूम्रपान वर्ज्य करावे. व्यावसायिक प्रदूषण टाळावे.

(३) जर वरचेवर अ‍ॅलर्जीमुळे खोकला, दमा यांचा त्रास होत असेल तर अ‍ॅलर्जी डॉक्टरांच्या मदतीने शोधून काढावेत. म्हणजे त्या अ‍ॅलर्जीमुळे त्रास न होण्यासाठी डी-सेन्सटायझेशन करता येते.

(४) गार हवेत जाणे टाळावे.

(५) भरपूर पाणी पिणे हे एक खोकल्याचे औषधच आहे. सकाळी उठाल्याबरोबर एक कप चहा घ्यावा.

(६) ज्यांना खोकल्यामुळे बरीच थुंकी (बेडका) येत असेल त्यांनी वाफारे घ्यावेत. तसंच निरनिराळ्या अवस्थेत झोपून थुंकी बाहेर काढावी. असे दिवसांतून निदान दोनदा तरी करावे.

(७) श्वसनाचा व्यायाम: व्यायामाच्या वेळी मोठा श्वास आत ओढून उच्छवास हळूहळू उघड्या तोंडाने सोडावा यामुळे हवा फुफ्फुसात कमीत कमी अडकून राहाते.

(८) जर दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग आलाच तर आपल्या दुखण्याबद्दल त्यांना प्रथम सांगणं आवश्यक असतं.

(९) आपल्याला जर क्रॉनिक कॉर पलमोनेल झालाच तर खाण्यातील मीठ कमी करावे.

(१०) या रुग्णाने ऑक्सिजनचा छोटा सिलेंडर घरी ठेवणे नेहमीच फायद्याच ठरतं.

वरील प्रकारची काळजी घेतल्यास रोग उत्पन्न होण्याचं बहुतांशी टाळता येतं. किंवा ती निर्माण झालाच तर त्याची कमी तीव्रता असते. चाळिशी गाठणं म्हणजे आपल्या जीवनातील संध्याकाळ झाली असं म्हणतात, ते खरंच आहे. चाळीशीत स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक अवस्थेत खूपच बदल घडून येत असतात. अशावेळी होणाऱ्या बदलांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी आपण खबरदारी घ्यायलाच हवी. तरंच आपल्या आयुष्याची संध्याकाळ आपण सुखासमाधानानं भोगू शकू.

- के. के. दाते (ऑन. ब्रिगेडियर डॉ. के. के. दाते)

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1382,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,6,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1116,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,9,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,3,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,3,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,70,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,12,निवडक,8,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,39,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,6,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1157,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,29,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,287,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,144,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,306,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,8,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,22,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: स्त्री चाळीशीनंतरचे आजार - आरोग्य (के के दाते)
स्त्री चाळीशीनंतरचे आजार - आरोग्य (के के दाते)
स्त्री चाळीशीनंतरचे आजार - स्त्रीस ग्रासणाऱ्या चाळीशीनंतरच्या आजारांची माहिती व उपायांबद्दल सखोल माहिती देणारा ब्रिगेडियर डॉ. के. के. दाते यांचा लेख.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQqyIaSkwZNvBeY2EQHKMmBLmb9qVvETgdFLotf-dzFFUlP20OueNKMhZSRT72er8BTkDwnwDh4gy9xWnyYHEW3RvxFmpaOfq55qK3_NLIKcrk2HYBLUNV7fVUAB3XV6VHLOUtQUXPQL2hw1PO00-cSWeoXDi0qwkBRzpazBYjFFYN2MZj7QCfwYeubg/s1600-rw/stree-chalishinantarache-aajar.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQqyIaSkwZNvBeY2EQHKMmBLmb9qVvETgdFLotf-dzFFUlP20OueNKMhZSRT72er8BTkDwnwDh4gy9xWnyYHEW3RvxFmpaOfq55qK3_NLIKcrk2HYBLUNV7fVUAB3XV6VHLOUtQUXPQL2hw1PO00-cSWeoXDi0qwkBRzpazBYjFFYN2MZj7QCfwYeubg/s72-c-rw/stree-chalishinantarache-aajar.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/07/stree-chalishinantarache-aajar.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/07/stree-chalishinantarache-aajar.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची