Loading ...

चॉकलेट डे

चॉकलेट डे - [Chocolate Day] एका बापाला आणि त्याच्या लेकीला चॉकलेट डे ची आनंदी भेट.

चॉकलेट डे

कशीबशी छत्री सावरत मी वाकून रिक्षावाल्याला विचारलं, “दादा, अमूक ठिकाणी?”

मोबाईल मधून डोकं न काढता, “हां, बसा”.

मी बसले. त्याचा फोन वाजला- “हा; मी सांगतो त्याला, तू दे त्याच्याकडं फोन. नायतर पाठवतो तुला हा.”

डावा खांदा आणि कानाच्यामध्ये फोन पकडून त्याचं संभाषण सुरुच होतं. बोलतच रिक्षा सुरु केली. मीटर टाकलं. कॉल झाला.

माझं मीटरकडे लक्ष गेलं. “दादा, अहो तुम्ही मीटर caliber करुन घेतलं नाहीये का?”

“हा ताई, स्वारी (सॉरी) सांगायचं विसरलो. आपन नाही ना केलंय ते. तुम्ही फक्त मीटरपेक्षा २० रुपय जास्त द्या.”

“पण तुम्ही हे आधी सांगायचं नाही का?”

“ताई स्वारी, मी फोनवर बोलत होतो.” असं म्हणून त्यानं एक पानाची पिचकारी टाकली रस्त्यावर.

पावसाचा जोर कमी झाला होता. पण माझ्याकडे पर्याय नव्हता. “बरं ठिके आता.”

“ताई, पोरीचा बड्डे (बर्थडे) आहे आज.”

मला वाटलं उगाच त्याने मीटरच्या विषयाला बगल दिली. “अरे वाह, हॅपी बड्डे सांगा माझ्याकडून.”

पावसातल्या संथ ट्रॅफीकमधून तो मार्ग काढत बोलत होता. “घरच्या घरी करणारे समजा. निस्ती लहान पोरंच. तरी बी हजारेक रुपय लागत्यालच. एक फ्रॉक घेतली तिच्यासाठी हा.” तो उत्साहानं सांगत होता.

“मस्तच की!” “तुम्ही बसलात तवा क नाय. तवाच आलती फ्रॉक. मागवली होती, आज भेटली. बरं आज तरी भेटली. त्येलाच ओटीपी सांगत होतो.”

“ओह! किती वर्षाची झाली मुलगी.” मी काहीतरी बोलावं म्हणून विचारलं.

“एक वर्षाची ताई. ताई धंदा पण झाला नाही आज. पण बड्डे तर करावा लागंल ना.” आता उत्साहाला निराशेची किनार होती. “ताई, तुम्हाला परत जायचंय का? मी थांबतो थांबायचं असेल तर.”

“नाही ओ.” “म्हणजे कंपल्शन नाये. पण आसल तर थांबतो.”

“नाही, नाही. मी बसने जाईन.”

“ओक्के.”

नंतर पाचेक मिनिटात पोहचले.

“किती झाले?”

“५८”.

“म्हणजे मी ७८ देऊ ना?”

“हा ताई, ८० करा राऊंड फिगर.”

मी शंभरची नोट दिली आणि उतरुन भाच्यासाठी घेतलेल्या २ कॅडबरीज् पर्स मधून काढून पुढे केल्या.

“दादा हे द्या तुमच्या मुलीला.”

त्याच्या डोळ्यातला पाऊस स्पष्ट दिसला. “थँक्यु ताई!” त्याने ५० ची नोट पुढे केली. “८० झाले ना? २० नाहीयेत?” “नायेत पन आन र्‍हाऊ द्या पन.”

“नाही तसं कशाला? असतील तर बघा. नाहीतर असू देत.”

त्याला खिशात शोधाशोध करुन १० चं नाणं सापडलं. मी तेव्हढंच द्या म्हणाले.

“ताई २ कशाला, एकच बस की क्यॅडबरी (कॅडबरी)” थरथरत्या आवाजात म्हणाला.

“असू दे. एक तुम्ही घ्या, हे असलं पान अन् पुडी खाण्यापेक्षा!” मी उगाच उपदेश दिला.

तो ओशाळला. हसून “थँक्यू ताई” म्हणून निघून गेला.

दादाची वाट बघत मी सहज FB scroll करत बसले.
कुणाची तरी पोस्ट दिसली.
‘Chocolate is a happiness that you can eat. Happy world chocolate day.’

असा happiness बाप लेकीला देता आला यातच मी happy होते!

- डॉ. सायली कुलकर्णी

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची