Loading ...

खबरदार जर टाच मारुनी - मराठी कविता (वा. भा. पाठक)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. भा. पाठक / वामन भार्गव पाठक यांची खबरदार जर टाच मारुनी ही लोकप्रिय मराठी कविता.

खबरदार जर टाच मारुनी - मराठी कविता (वा. भा. पाठक)

सावळया: खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या


खबरदार जर टाच मारुनी - मराठी कविता (वा. भा. पाठक)

ज्येष्ठ प्रसिद्ध कवी वा. भा. पाठक (वामन भार्गव पाठक) यांची लोकप्रिय कविता खबरदार जर टाच मारुनी.



सावळया:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाडही माझे लेचपेचे नसे
या नसानसांतनू हिंमतबाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या

स्वार:
मळयात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा
मुठीत ज्याच्या मूठ असेही खड्गाची तो बरे
वीर तु समजलास काय रे
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या

सावळया:
आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर बायकी
किती ते आम्हाला ठाऊकी
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का
दाविती फुशारकी का फुका
तुम्हासारखे असतील किती लोळिवले नरमणी
आमुच्या शिवबाने भररणी
मी असे इमानी चेला त्यांचेकडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचेपुढे
देईन न जाऊ मी शूरवीर फाकडे
पुन्हा सांगतो खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या

लालभडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे
तया बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळया बोल पुन्हा एकदा
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या


खबरदार जर टाच मारुनी । कॉम्रेड गोविंद पानसरे (व्हिडिओ)



- वा. भा. पाठक (वामन भार्गव पाठक)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची