Loading ...

केवढे हे क्रौर्य (मराठी कविता)

केवढे हे क्रौर्य - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ना. वा. टिळक (नारायण वामन टिळक) यांची लोकप्रिय कविता केवढे हे क्रौर्य.

केवढे हे क्रौर्य (मराठी कविता)
केवढे हे क्रौर्य (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
केवढे हे क्रौर्य - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ना. वा. टिळक (नारायण वामन टिळक) यांची लोकप्रिय कविता केवढे हे क्रौर्य.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी म्हणे निजशिशूप्रती, अधिक बोलवेना मला तुम्हास अजि अंतीचा कवळ एक मी आणला करा मधुर हा, चला, भरविते तुम्हा एकदा करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथा सदा अहा, मधुर गाउनी रमविले सकाळी जना कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना तुम्हास्तव मुखी सुखे धरुन घास झाडावरी क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरी निघुन नरजातिला रमविण्यात गेले वय म्हणून वधिले मला, किती दया, कसा हा नय उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रिया लेकरा म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी जिवंत बहु बोलके किती सुरम्य ते उत्पल नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल मातीत ते पसरिले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबवीले निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले

- ना. वा. टिळक (नारायण वामन टिळक)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची