रानाची शोभा - मराठी कविता

रानाची शोभा, मराठी कविता - [Ranachi Shobha, Marathi Kavita] सुर्य उगवला खुशीत भारी, डोंगराच्या पलिकडून निघाला किनारी, पाहुन ते सोनेरी रान.
रानाची शोभा - मराठी कविता
रानाची शोभा (मराठी कविता), छायाचित्र: हर्षद खंदारे.
सुर्य उगवला खुशीत भारी..

सुर्य उगवला खुशीत भारी डोंगराच्या पलिकडून निघाला किनारी पाहुन ते सोनेरी रान ते पाहुन माझं हरपलं सर्वभान आज सगळीकडे भोभा न्यारी आले सरसर किरण खाली चमकु लागले दवात भारी समदं रान फुलुन आलं पाहुन मन माझं भुलुन गेलं समद्या रानात धावु लागलं मग दाट होऊन सूजल रान पक्ष्यांनी पाहून गेले त्यांचे भान समद्या डाळीत गिरट्या घेत पानापानात गाणी गात नाचुन आलं सारं हे रान रवि - भास्कराची कराया पुजा नाचत आला जंगलचा राजा झाडांनी नेसली हिरवी झाडी फुलांनी घातली केसात वेणी पाहुन चारी दिशा उजळुन गेल्या

- राजेंद्र भोईर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.