हा क्षण - मराठी कविता

हा क्षण - मराठी कविता - [Ha Kshan, Marathi Kavita] दोन अक्षरांचा हा शब्द मनुष्याचे संपूर्ण जीवनमान, पडद्या समोर आणण्याची ताकद ठेवतो.
हा क्षण - मराठी कविता
हा क्षण (मराठी कविता), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
दोन अक्षरांचा हा शब्द मनुष्याचे संपूर्ण जीवनमान

दोन अक्षरांचा हा शब्द मनुष्याचे संपूर्ण जीवनमान पडद्या समोर आणण्याची ताकद ठेवतो प्रत्येक प्रसंगासोबत नाळी प्रमाणे जोडून येतो सुखात आणी दुःखात सुद्धा सामील असतो हा क्षण डोळ्याची पापणी जेवढ्या वेगात उघड झाप नाही करत त्याच्यापेक्षा कितीतरी वेगवान असतो हा क्षण क्षण कधी जपून ठेवावे लागतात तर कधी त्यांचं विस्मरण केलेलेच बरे असते मनुष्याच्या चेहऱ्यावरच्या हसूचे गुपित आणी रडण्याचे कारण पण बनून जातो हा क्षण क्षण आपण कधी घडवून आणतो तर तो कधी नकळत घडून जातो, म्हणून तो प्रत्येक प्रसंगी आपल्या वाट्याला येतो बोलतात ना मी तो क्षण आता विसरलो पण खरं सांगू, मनुष्य आयुष्यामध्ये घडलेला कोणताच क्षण कोणत्याही क्षणी विसरू शकत नाही कारण तो कधी तरी घडलेला एक क्षणचं असतो क्षण आयुष्यभर आपल्या सोबत असतो आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेल्या निरीक्षण आणी परीक्षणा चा तो एक भाग असतो

- कुणाल खाडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.