अक्रोडचे लाडू - पाककृती

अक्रोडचे लाडू, पाककला - [Akrodache Ladoo, Recipe].
अक्रोडचे लाडू - पाककृती | Akrodache Ladoo - Recipe

अक्रोडचे लाडू


अक्रोडचे लाडूअक्रोडचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • २५० ग्रॅम खवा
 • १० अक्रोडचा गर
 • ८ चमचा पिठीसाखर

अक्रोडचे लाडू करण्याची पाककृती


 • अक्रोडचा गर चुरून घ्या.
 • हलक्या हाताने कुटून घ्या.
 • अगदी पूड करायची नाही.
 • साधारण जाडसर असावा.
 • नंतर एका पातेल्यात घालून जरा परतून घ्यावा.
 • तूप वगैरे घालायचे नाही.
 • खवाही थोडासा परतून घ्या.
 • नंतर त्यात साखर घालून परता.
 • अक्रोडचा चुरा घाला.
 • मिश्रण घट्टसर झाले की उतरवा व ताटात ओता.
 • थंड झाले की छोटे छोटे लाडू वळावे.

अक्रोडचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.