नक्षत्रवेल - मराठी कविता

नक्षत्रवेल,मराठी कविता - [Nakshatravel,Marathi Kavita] जल्लोषात करूनही तुझे स्वागत कोरोना महामारीने दु:खावेलेस आप्त.
नक्षत्रवेल - मराठी कविता | Nakshatravel - Marathi Kavita

जल्लोषात करूनही तुझे स्वागत कोरोना महामारीने दु:खावेलेस आप्त


कवी आकाश भाऊ पवार यांच्या ‘आभाळा’ या कवितासंग्रहातून.जल्लोषात करूनही तुझे स्वागत
कोरोना महामारीने दु:खावेलेस
आप्त, मित्र सारेच गमावून
का? असे वर्षभर छळलेस!

तुझ्या नव्याची, नाविन्याची स्वप्ने
आम्ही होती सारी रंगवली
ती अडीच महिन्यातच तुझ्या
वागण्यानी कायमची दुरावली!

नव्याचे नऊ दिवस सुखाचे
जगून पुन्हा दु:खातच जगलो
जगण्याच्या याच धडपडीत
जीवन जगणेही हो विसरलो!

निसर्गाच्या पुढे हारूनही जीवन
जगण्याची कला तू शिकवली
माणुसकीची कास धरून जगी
जीवनाची लढाई शर्थीने लढली!

२०२० अलविदा करतोय तुला
दिवसही चालला मावळतीला
करूया जल्लोष हो आनंदानी
जाऊया सामोरे २०२१ नववर्षाला!

- आकाश भाऊ पवार

1 टिप्पणी

  1. Super poem
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.