बिनाअंड्याचा चॉकलेट केक (सोपी रेसिपी)

बिनाअंड्याचा चॉकलेट केकची सोपी रेसिपी - [Eggless Chocolate Cake] सौ. वृषाली काकडे यांची एगलेस चॉकलेट केकची सोपी पाककृती.
बिनाअंड्याचा चॉकलेट केक (सोपी रेसिपी) - पाककला | Eggless Chocolate Cake - Recipe

एगलेस चॉकलेट केकची अगदी सोपी पाककृती

बिनाअंड्याच्या चॉकलेट केकचे साहित्य
 • मैदा १ कप
 • कोको पावडर २ टेबल स्पून
 • पिठी साखर २ टेबल स्पून
 • बेकिंग पावडर १ टीस्पून
 • बेकिंग सोडा १/२ टीस्पून
 • बटर २ टेबल स्पून
 • तेल २ टेबल स्पून
 • कंडेन्स्ड मिल्क १/२ कप
 • दूध १/२ कप
 • व्हिनेगर १ टीस्पून
 • व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून

बिनाअंड्याच्या चॉकलेट केकची पाककृती
 • प्रथम एका जाड भांड्यात एक रिंग ठेऊन झाकण लावून केकचे भांडे मिडीयम ते लो हिटवर प्रिहिट करण्यासाठी ठेवावे.
 • केक टिन / केकचे भांडे तयार करून बटर पेपर व्यवस्थित लावून घेणे.
 • एका बाऊलमध्ये बटर, तेल व पिठीसाखर घालून मिक्स करून घ्यावे व त्यात कंडेंस्ड मिल्क घालून व्यवस्थित मिक्स करावे.
 • दुसरे बाऊल घेऊन त्यात दूध, व्हिनेगर व व्हॅनिला इसेन्स घालून १ ते २ मीनिटे बाजूला ठेऊन द्यावे.
 • दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून घेणे.
 • आता कंडेंस्ड मिल्कचे मिश्रण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणे. त्यात निम्मे दुधाचे मिश्रण व निम्मे मैद्याचे मिश्रण असे दोन टप्प्यात टाकून हलक्या हाताने मिक्स करावे.
 • गरज वाटल्यास कन्सिस्टन्सी दुरूस्त करण्यासाठी एखादा चमचा दूध वापरू शकता.
 • मिश्रण केक टिन / केकच्या भांड्यामध्ये घालून केक बेक करण्यासाठी ठेवावा.
 • केक ३० ते ३५ मीनिटे बेक करावा किंवा केक मध्ये सुरी टोचून पहावी आणि सुरीला केक न चिकटल्यास केक बेक झाला असे समजावे.

बिनाअंड्याच्या चॉकलेट केक अधिक चांगला होण्यासाठी महत्वाच्या टिपा
 • भांडे प्रिहिट / आधीच थोडे गरम करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे केक व्यवस्थित फुगतो.
 • केक टिन (केकचे भांडे) व्यवस्थित तयार केले की केक अलगद निघण्यास मदत होते.
 • केक करता लागणारे सर्व साहित्य रूम टेंपरेचरवर असायला हवे.
 • मैदा व बाकीचे साहित्य चालून घणे त्यामुळे केक हलका होतो.
 • मिश्रण जास्त मिक्स करायचे नाही त्यामुळे केक गच्च/घट्ट होतो.
 • केक बेक होत असतांना शक्यतो २५ मीनिटे भांडे उघडून बघायचे नाही; त्यामुळे केक मधेच बसू शकतो.


- वृषाली काकडे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.