Loading ...
/* Dont copy */

डाळींबी भाग ५ - मराठी कथा

डाळींबी भाग ५, मराठी कथा - [Dalimbi Part 5, Marathi Katha] डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा.

डाळींबी भाग ५ - मराठी कथा | Dalimbi Part 5 - Marathi Katha

डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा

हे सर्व ऐकून सदानंदला कांचनचा खूप राग येतो. तो ज्योतीला वचन देताना म्हणतो की "बेटा तू काही काळजी करू नको मी तुझ्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या चांडाळणीला जेलमध्ये पाठविल्या शिवाय गप्प बसणार नाही. जिथे कांचनने ज्योतीच्या डोक्यात घातलेला पाटा फेकून दिला आहे. त्या ठिकाणी घेऊन जाते.

दुसऱ्या दिवशी सदानंद तडक गावातील पोलिस स्टेशनला जातो व कांचन विरूद्ध गुन्हा नोंदवतो की तिने माझी फसवणूक केली आहे. आणि माझ्या एकुलत्या एक मुलीला मारले आहे. पोलिस सदानंदकडे पुरावा मागतात सदानंद त्यांना आपल्या घराकडे येण्याची विनंती करतो पोलिस श्वान पथकासह सदानंदच्या घरी दाखल होतात. सदानंद पोलिसांना ते ठिकाण दाखवतो जिथे ज्योतीला पुरलेले असते पोलिस तिथे खोदकाम करतात तर पोलिसांना तिथे एका लहान मुलीचा सांगाडा मिळतो श्वान पथकाला ही तो पाटा सापडतो ज्याने कांचनने ज्योतीचा जीव घेतलेला असतो. त्या पाटावर ज्योतीच्या रक्ताचे डाग असतात. पोलिस ताबडतोब लातूर जिल्ह्यातील फॉरॕन्सिक लॕबमध्ये हडाचे नमुने तपासणीसाठी पाठवतात. सदानंद वकीलांशी चर्चा करतो. थोड्या वेळाने फॉरॕन्सिक विभागाचा रिपोर्ट येतो की हे प्रेत ज्योतीचे आहे पाटावरील रक्ताचे डागही तिचेच आहेत त्या पाटावर एका व्यक्तीच्या हाताचे ठसे ही अढळून येतात.

पोलिस ताबडतोब सदानंद सोबत कांचनला अटक करायला तिच्या गावी जातात कांचन आपल्या घरात टिवी लावून एक प्रोग्राम पाहात असते पोलिस तिच्या घरी येतात पोलिसांना पाहून कांचनचे वडील त्यांना विचारतात कि काय झालं साहेब पोलिस कांचनच्या वडिलांना सर्व घटना सांगतात पोलिसांच्या गाडीचा हॉर्ण ऐकून कांचन घराबाहेर येते तिला पाहून सदानंद तिच्या अंगावर मारायला धावून जातो पण पोलिस त्याला तिथे आवरतात पोलिस कांचनल ज्योती या लहान मुलीच्या खुनापाई अटक करतात व तिला पोलिसठाण्यात आणतात तेव्हाही ती नशेमध्ये असते. पोलिस तिला कस्टडीमध्ये आणतात. व तिची कसूर चौकशी करतात सुरूवातीला ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागते शेवटी एक महिला पोलिस अधिकारी कांचनच्या सणसणीत कानशिलात लगावते मग कांचन अगदी सुता सारखी सरळ होऊन पोलिसांना उत्तरे देऊ लागते. कि कशा पद्धतीने तिने ज्योतीचा दारू पिऊन छळ केला व याच दारूच्या व्यसनामुळे तिचा पहिल्या पतीशी घटस्फोट झाला होता. व याच नशेत तिने ज्योतीचा निर्घूण खून केला ती सगळे आरोप कबूल करते.

हे सगळे चौकशीदृश्य सदानंद एका खिडकीतून पाहात असतो. सर्व चौकशी पूर्ण करून पोलिस कांचन व तिच्या वडिलांना लातूरचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर करतात सदानंदचा जबाब वा कांचनने कबूल केलेले सगळे आरोप आणि फॉरॕन्सिक लॕबचा कांचनच्या हाताचे ठसे याचा रिपोर्ट पाहाता न्यायालय कांचनच्या वडिलांना सदानंद माळी यांची फसवणूक अब्रू नुकसान आणि कांचनवर फसवणूक व एका लहानग्या मुलीचा निर्घूण खून या आरोपांखाली भारतीय दंड विधान संहिता अंतर्गत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून दहा वर्षांचा कारावास जाहीर करतात.

सदानंद कोर्टातून घरी परततो गावातील गावकरी त्याला धीर देतात. सदानंद सर्वांचे आभार मानतो. सर्व गावकरी आपल्या घरी जातात सदानंद घरी एकटाच असतो त्याला शारदा व ज्योती यांची खूप आठवण येत असते. तो तसाच मागील परड्यात जातो रात्र झालेली असते. त्याला ज्योतीचा निरागस आवाज ऐकू येतो. " बाबा! सदानंद समोर पाहतो समोर ज्योतीची आकृती उभी असते. "बाबा तुमचे खूप खूप आभार आज तुमच्यामुळे मला मुक्ती मिळाली मी आईकडे जाऊन तिला भेटून सर्व काही सांगाते. तुम्ही मुळीच काळजी करू नका. पुढच्या जन्मुही मी तुमच्या व आईच्या पोटी जन्म घेणार आहे. तशी विनंती मी देवबाप्पाला करणार आहे. हे सर्व ऐकत असताना सदानंदच्या डोळ्यांतून अश्रू तराळत असतात. शेवटी एक मंद प्रकाश येतो व ज्योतीच्या पवित्र आत्म्याला आपल्या सोबत घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणावर एक मोठे झाड उभे राहिलेले सदानंदला दिसते त्या झाडाची सावली त्याच्या अंगावर पडलेली असते. ते झाड डाळींब या फळाचे असते ज्योतीच्या कृपाशिर्वादाने तिथे डाळींब या गोड फळाचे डेरेदार वृक्ष उभे असते. त्या झाडाच्या माध्यमातून ज्योती ही नेहमीच सदानंद सोबत असल्याची जाणीव त्याला होते.

क्रमशः


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची