माझेच हळवेपण शोधितो मी, वाटेवरी काट्यांचे चालतो हळवाच मी
माझेच हळवेपण शोधितो मीवाटेवरी काट्यांचे चालतो हळवाच मी
सोशितो डंख दाह काट्यांचे एकटाच मी
चेहऱ्यास रंगवितो हास्याने वेडाच मी
ओठांवरी लावितो रंग लाल रक्ताचा मी
चालणे हे माझे कधी कुठे थांबतच नाही
रस्त्यावरी जीवनाच्या सदैव चालतो मी
आकाश बोलत नाही, वारा दिसत नाही
पाणी थांबत नाही आणि आताशा
आग ही झोंबत नाही जाळत नाही
जमिनीवरी उभा जसा निष्प्राण मी
पंचतत्वात विलिन होण्या सज्ज वैराण मी
अजाण मी, हताश मी, असहाय्य मी
देवत्व उधारी ने घेणारे दानव पाहतो मी
उधारी बुडवुन देवत्व विकणारे दैत्य पाहतो मी
मैत्रिस उध्वस्त करणारे मित्र पाहतो मी
प्रेयसीला बेईज्जत करणारे प्रियकर पाहतो मी
आई वडीलांस नकोसं करणारे मुलं पाहतो मी
जीवनाच्या ह्या महाविस्तिर्ण अथांग रगाड्यात
अहंकाराचे कोठी वर जगण्यासच करोनी हतबल
जीवनास करोनी विवस्त्र नाचविणारे क्रुर
हलकटपणाचे विड्या वर वर्ख लावोनी आराजकतेचा
निर्लज्जपणाची पिक उडविणारे नरभक्षक पाहतो मी
जीवन आणि जगणं कसलं हो; जगणं साहतो मी
जीवंतपणाची भिक मागताना जीवनास पाहतो मी
असहाय्यतेच्या कटोऱ्यात जीवनाच्या
माझ्याच श्वासांचे शिळेच तुकडे फेकतो मी
माझ्याच श्वासांचे शिळेच तुकडे फेकतो मी
माझ्याच श्वासांचे शिळेच तुकडे फेकतो मी
- अमोल सराफ (अमोल बिदेसियाँ)