तृष्णा भाग ४ (सौ सुनार की...) - मराठी कथा

तृष्णा भाग ४,मराठी कथा - [Trushna Part 4,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.

तृष्णा भाग ४ - मराठी कथा | Trushna Part 4 - Marathi Katha

कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!


सौ सुनार की एक लोहार की!
२००३ - पुणे

“या राजे या! दादासाहेबांनी विश्वजीतला आत बोलावले!
या, तुमची ओळख करुन देतो ताईंशी.

“हे आमचे सुपूत्र, विश्वजीत आणि ह्या वैदेही मॅडम, म्हणजे आपल्या सांगलीच्या गोखले सरांची मुलगी!
वैदेही ने विश्वजीत कडे बघुन, फक्त अनोळखी स्मित केले.

दादासाहेब बोलत होते... “तुम्हाला कदाचित आठवत नसेल, तुम्ही लहान होतात तेव्हा. पण गोखले सर आपल्या कोल्हापूरात होते शिकवायला काही वर्ष. अतिशय हुशार आणि उत्तम शिक्षक बर कां!! आपल्या राजर्षी शाहू विद्यालयाची मुलं मेरिट मधे आली होती त्या वेळेस.

“त्याच वर्षी सरांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. आपण सत्कार केला होता मोठा कोल्हापूरात!
...आणि ह्या वैदेही मॅडम एक खुप छान आठवण सांगितली. दहावीमधे त्या बोर्डात आल्या होत्या त्यावेळेची, माझ्या हातून बक्षीस घेतले आहे त्यांनी, कौतुक समारंभात...!

विश्वजीत बधीर झाल्यासारखा त्यांचं बोलणं ऐकून फक्त मान हलवत होता. हि बया नक्की कशाला इकडे आली आहे आणि काय काय बोलणार आहे हेच त्याला कळेना, तेवढ्यात दादा साहेबांनी खुलासा केला.

“मॅडम आम्हाला त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमाकरता आणि तुम्हाला “Students ग्लोबल meet” करता बोलवायला आल्या आहेत, कराड सर आमचे जुने मित्र आणि स्नेही आहेत. त्यांना सांगा, आम्ही नक्की येऊ.

बाहेर जाधवांकडे तुमचं लेटर देऊन ठेवा. म्हणजे ते तारीख ब्लॉक करुन ठेवतील.

या आता! तुमच्या मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दादासाहेब नमस्कार करुन मिटींग संपवणार इतक्यात त्यांना आठवण झाली...
अरे! हो विश्वजीत तुमच्या कारची चावी हरवली होती का?? आपली गाडी उभी होती म्हणे ह्यांच्या घराजवळ, दोन चार दिवस, तिकडेच सापडली त्यांना. नशीब त्यांनी आपल्या गाडीचा नंबर लक्षात होता म्हणून त्यांनी पत्ता शोधून काढला. तुम्ही आभार माना त्यांचे.

“अहो! त्यात काय येवढं! मी माझी ड्युटी केली!” असं बोलत, विश्वजीतकडे बघत, वैदेही उठली. “OK. दादासाहेब, मी निरोप घेते आपला! कार्यक्रमाला आपली वाट बघतोय!”

दादासाहेब, मी यांना खाली गाडीपर्यंत सोडून येतो... असं सांगून विश्वजीत पण तिच्या बरोबर बाहेर पडला.
“हे सगळं काय आहे??! रागाने बघत त्याने वैदेहीला विचारलं.

“आज फक्त चावी आणून दिलेय. दादासाहेबांबद्दल आदर आहे म्हणून तोंड उघडलं नाहीए समजल?? ते केलं तर काय होईल ते लक्षात ठेवा. Goodbye विश्वजीत भोसले!”

कॉलेजचा कार्यक्रम अप्रतिम झाला. उत्तम नियोजन, समालोचन आणि प्रमुख पाहुण्यांची भाषणं, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग याने त्याला साज चढला. वैदेहीचे समालोचन व प्रारंभीचं भाषण नुसतंच माहितीपूर्ण नाही तर विद्वत्तापूर्ण होतं. सर्व समारंभात ती आज उजवी ठरली होती. दादासाहेबांनी आणि चेअरमन साहेबांनी सुध्दा तिच्या नियोजनाबद्दल तीचं भरभरून कौतुक केल होतं. विश्वजीत आणि त्याच्या दोस्त मंडळीच्या नाकाला प्रचंड मिरच्या झोंबल्या होत्या.

तिच्या दादासाहेबांशी निघालेल्या डायरेक्ट ओळखीमुळे विश्वजीतचे हात बांधलेले होते. दादासाहेबांशी बोलत ती त्याच्या समोरुन गेली त्या वेळी ती आपल्या कडे उपरोधिक हासतें आहे असे पण भास त्याला होऊन गेला. रात्री दोस्तांबरोबर बोलताना, आपल्याला आता तोंड दाखवायला जागा उरली नाही असं त्याला वाटायला लागलं.

गप्पा मारता मारता उशीर झाला होता. दादासाहेब आज पुण्यात राहणार होते. घरी जायला उशीर करुन चालणार नव्हता. तो निघणार इतक्यात जाधवांचा फोन आलाच. राजे!! कुठे आहात तुम्ही?? लवकर घरी या. दादासाहेब कसतरी करतायत!

विश्वजीतने गाडी रेझ केली आणि शंभरच्या स्पिडने तो फ्लॅटवर पोहोचला. दादासाहेबांना छातीत प्रचंड वेदना होत होत्या. श्वास घ्यायला त्रास होत होता. जाधवांनी हार्ट् ब्रिगेड बोलावली होती. धडाधड फोन लावले, दिनानाथची अ‍ॅम्ब्युलन्स दहाव्या मिनीटांला येऊन धडकली. अर्ध्या तासाच्या आत दादासाहेब ICU मधे अ‍ॅडमिट झाले होते. विश्वजीतला सुचत नव्हतं. सगळ्या टेस्ट करणं सुरू होतं. दुसऱ्या दिवशी एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करणं आवश्यक होतं. जाधवांनी समजावलं तरी, विश्वजीत पुढचे काही दिवस आता तिकडेच बसणार होता. मित्राला फोन करुन त्याने स्वतःचा इमेल आणि पासवर्ड दिला आणि असाईनमेन्ट मॅनेज करायला सांगितल्या होत्या.

डॉक्टर अतिशय निष्णात आणि अनुभवी होते. एंजिओप्लास्टी न करता डायरेक्ट बायपास करायला लागणार होती. दादांचे सगळे निकटवर्तीय जमा झाले होते. ऑपरेशन उत्तम पार पडले आणि दादासाहेब शुध्दीवर आल्यावर सर्वांना हायसं झालं.

पंधरा दिवस तरी इथेच राहणं आवश्यक होतं. विश्वजीत तर दादांच्या जवळुन हालतच नव्हता. त्याने आईला गमावले होते पण वडिलांना गमवायची तो कल्पना पण करु शकत नव्हता.

दादासाहेबांची रीकव्हरी झपाट्याने होत होती. आराम पडत होता. दहा बारा दिवस होत आले. हॉस्पिटल च्या VVIP रुम मधे दादासाहेब आराम करत होते. जाधवांचा फोन घणघणला. साहेब! ACP सावंत बोलतायत. त्यांना काहीतरी महत्त्वाचे अर्जंट बोलायचं आहे म्हणतात.

दादासाहेबांनी फोन घेतला. एसीपी बोलत होते. “साहेब, जरा नाजुक केस आहे, म्हणून डायरेक्ट तुमच्याशी बोलतोय...! इतर कुठची तक्रार असती तर मी तिकडेच मिटवलं असतं पण अब्रू नुकसान आणि पूर्वीच्या भांडणाचा वचपा म्हणून अशा प्रकारे चारित्र्यहनन करण्यात आले आहे अशी तक्रार आहे.या अगोदर ही कोथरुड चौकीत विश्वजीत बद्दल तक्रारी आलेल्या आहेत. ज्या ईमेलवरुन त्यांचे फोटोशॉप केलेले फोटो आणि त्यांच्या बद्दल घाणेरडा मजकूर आहे तो ईमेल विश्वजीतचा आहे साहेब!!

याची दखल घेतली गेली नाही तर मॅडम मिडीयात जाऊ शकतात.

“काही महिन्यांवर इलेक्शन आहे साहेब! हे प्रकरण पुढे जायच्या आत मिटवून घ्या. आपले जुने संबंध म्हणून तुम्हाला अलर्ट करायला फोन केला!”. दादासाहेबांनी फोन ठेवला आणि डोळे मिटून घेतले. दहा पंधरा मिनिटे ते विचारात गढलेले होते. इतक्या वर्षात दादासाहेब राजकारणात पक्के मुरलेले होते. काय केल्याने स्वतःचे आणि पक्षाचे कमी नुकसान होईल आणि कशामुळे फायदा होईल याची जाण त्यांना अचूक होती.

त्यांनी जाधवांना बोलावून घेतलं. “जाधव! वैदेही मॅडमना इकडे बोलवून घ्या. आपली गाडी पाठवा. सांगा, आम्हाला अर्जंट बोलायचे आहे आणि हो! आम्ही त्यांना बोलावलय हे विश्वजीतला सांगू नका!!

कॉलेजच्या कार्यक्रमाच्या यशामुळे नंतरचे काही दिवस सर्वजणं वैदेहीचं कौतुक करत होते. वैदेहीच्या शिस्तबध नियोजनाची आणि भाषणातून तिच्या विद्वत्तेची चूणूक सर्वांनाच समजली होती. दादासाहेबांना भेटल्या नंतर मुलांचा त्रास बंद झालेला होता. आपण केलेली चाल यशस्वी झाली हे लक्षात आल्याने वैदेहीला मनापासून आनंद झाला होता.

मॅडम! तुम्हाला आपल्या डीन सरांनी बोलावलंय! असा निरोप आल्यावर वैदेही केबिनमधे पोहोचली.
या मॅडम, बसा! How are you? Is everything OK?
“काय झालं सर?? तुम्ही असं का विचारताय?? वैदेहीला सरांच्या बोलण्याचा रोख कळेना.
“एका सोशल (एस्कॉर्ट - call girls) साईटवर तुमचा अश्लील फोटो आणि मजकूर छापला गेलाय. आपल्याच एका स्टुडंटने मला आज दाखवलं. हे सर्व काय आहे???

वैदेहीला डोळ्यासमोर अंधारल्यासारखे झाले. कोणीतरी क्रुर चेष्टा केली होती आणि ते कोण असु शकेल ह्याची तीला थोडीफार कल्पना पण आली होती. जे काही झालं होतं ते इतकं अपमानास्पद होतं की संयमाचा कडेलोट झाला होता. वैदेही तडकाफडकी पोलीस मुख्यालयात पोहोचली. एसीपी सावंतांना भेटुन तिने मुळापासून सर्व गोष्टी कथन केल्या. ह्यावर त्वरित कारवाई केली गेली नाही तर पेपरमधे जाईन अशी धमकी द्यायला ती विसरली नाही. धुमसतच ती घरी पोचली. झालेल्या अपमानाने आणि त्रासाने तीच्या डोळ्यातून अश्रू आले.

परदेशातून परत आली तेव्हा ती मनात भव्य दिव्य स्वप्न घेऊन आली होती. विद्यार्थ्यांना घडवायचे स्वप्न! समाजाला, नव्या पिढीला घडवायचे स्वप्न! खरोखरचं सत्य स्वप्नापेक्षा एवढं वाईट असतं??? तिचा भ्रमनिरास झाला होता. सासुने तीच्या पाठीवर हात फीरवून तीला कॉफी दिली. तीची समजूत घातली तरी वैदेहीची खिन्नता कमी झाली नाही.

इतक्यात दारावरची बेल वाजली. जाधवांची चिठ्ठी घेउन ड्रायव्हर गाडी घेउन आला होता. दादासाहेबांनी तीला सत्वर भेटायला बोलावले होते. येत नाही असं सांगायचं अगदी तोंडावर आलं होतं पण दादासाहेब हॉस्पिटल मधे आहेत हि बातमी तीला समजली होती. नाईलाजाने ती गाडीत बसली आणि भेटायला निघाली.

दादासाहेबांनी वैदेहीला खोलीत बोलावून बाकी सर्वांना बाहेर काढले. अगदी जाधव सुध्दा. विश्वजीत नेमका त्या वेळेस जेवायला बाहेर गेला होता. तीस चाळीस मिनिटे दरवाजा बंद होता. बाहेर जाधवांचं टेन्शन वाढत चाललं होतं. विश्वजीत परत आला तेव्हा बाहेरच्या लॉबीत बसलेल्या जाधवांचे आणि निकटवर्तीय मंडळीचे चेहरे बघुन त्याला काळजात धस्सं झालं.

इतक्यात दार उघडलं आणि वैदेही बाहेर पडली आणि काहीही न बोलता खाली उतरुन निघून गेली.
विश्वजीतला, मित्राने, त्याचा मेल वापरून केलेले चाळे एव्हाना समजले होते. जे झालं ते चुकीचे आहे हे ही कळत होतं. पण त्याबंदल चिंता करायला त्याला वेळ नव्हता. दादासाहेबांची तब्बेत सुधारणे हेच आत्ता महत्त्वाचे होते.

“विश्वजीत, आत या! मला तुमच्याशी बोलायचं आहे! दादा साहेबांची हाक आल्यावर विश्वजीत चुपचाप त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला.
“विश्वजीत! खुप वर्षे आम्ही राजकारणात आहोत. आम्ही शिकलो नाही याचं आम्हाला कायम वाईट वाटलं तरी आमचं कर्तव्य आम्ही चोखं केलं. शेती सांभाळली, कारखाने सांभाळले, निवडणूक लढवली. दौरे केले. अगदी शेवटच्या मतदारापर्यंत संपर्क ठेवला. पण आम्ही आता थकलो.

तुम्ही खुप शिकावं, आमच्या पेक्षा खुप मोठं व्हावं, आम्ही फक्त आमदारकी घेतली, पण तुम्ही दिल्ली पर्यंत मजल मारावी अशी आमची इच्छा आहे. आमच्या तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत.

येणारी निवडणूक आम्ही लढणार नाही. डॉक्टरांनी आता आमच्यावर खुप बंधन घातली आहेत. ती आम्हाला पाळायलाच हवीत.

त्याच्या पुढच्या, म्हणजे पाच वर्षांनंतर होणाऱ्या इलेक्शन पर्यंत तुम्ही वयाने eligible व्हाल. पण राजकारणात तेवढच उपयोगी नसतं. त्या करता अफाट तयारी करावी लागते. स्वताःमधे बदल करावा लागतो. आपल्या बरोबर येतील अशी चांगली आणि गुणी माणसं निवडावी लागतात. माझे समर्थक, आपला पैसा आणि माझे संपर्क याचा तुम्हाला फायदा होईलच, तेवढा वारसा तुम्हाला लाभला आहे ! पण एक लक्षात ठेवा, कर्तुत्वाचा वारसा हा वंशपरंपरागत नसतो! कर्तृत्व स्वतः निर्माण करायचं असतं! स्वतः घडवायचं असतं. ते केलं तरच तुम्ही लांबचा पल्ला गाठणार आहात. पुढच्या महिन्यात तुमची परिक्षा झाली की लगेच आपण कामाला लागायचे आहे. माझी माणसं तुम्हाला मदत करतीलच पण तुमच्या करता संपूर्ण वेगळी टीम तयार करायची ठरवली आहे मी आणि त्या टीमची प्रमुख म्हणून मी वैदेही मॅडमना नियुक्त केलेलं आहे! या क्षणा पासून, त्या सांगितील आणि ठरवतील त्या सर्व गोष्टी तुम्ही पार पाडणार आहात...!

पूर्णपणे बधीर आणि अवाक झालेल्या विश्वजीतच्या तोंडातून फक्त... “पण, दादासाहेब?!... एवढेच बाहेर पडले...

“या आता! आम्हाला आता आराम करु दे! निघा. कामाला लागा! एवढे बोलून दादासाहेबांनी डोळे मिटले आणि विश्वजीतकडे आपली पाठ वळवली. कुठल्यातरी दरीतून आपण फेकलें जात आहोत ह्या विचित्र भावनेने विश्वजीत डोक्याला हात लाऊन वेटींग रुमच्या चेअर मधे कोसळला!

क्रमशः
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

अभिप्राय

ब्लॉगर: 1
भारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे.

अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.

मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी.  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,10,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,865,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,633,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,10,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,3,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,15,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,6,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,267,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,33,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,61,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,3,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,205,पालकत्व,6,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,9,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,9,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,72,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,87,मराठी कविता,486,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,22,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,28,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,12,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,353,मसाले,12,महाराष्ट्र,271,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,46,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,15,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,9,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,23,संपादकीय व्यंगचित्रे,14,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,88,सायली कुलकर्णी,5,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: तृष्णा भाग ४ (सौ सुनार की...) - मराठी कथा
तृष्णा भाग ४ (सौ सुनार की...) - मराठी कथा
तृष्णा भाग ४,मराठी कथा - [Trushna Part 4,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
https://1.bp.blogspot.com/-ouh3u9vUvfI/YDCVQgvBRdI/AAAAAAAAGEQ/AzQzmscimbM7mlCwO1ZCaHIB0k6LFCaRACLcBGAsYHQ/s0/trushna-part-4-marathi-katha.jpg
https://1.bp.blogspot.com/-ouh3u9vUvfI/YDCVQgvBRdI/AAAAAAAAGEQ/AzQzmscimbM7mlCwO1ZCaHIB0k6LFCaRACLcBGAsYHQ/s72-c/trushna-part-4-marathi-katha.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2021/02/trushna-part-4-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2021/02/trushna-part-4-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची