सांजप्रभा - मराठी कविता

सांजप्रभा, मराठी कविता - [Sanjprabha, Marathi Kavita] रंग केशरी अन् पिवळा, मिसळे वरचेवरी, नभी नक्षत्रांची रास ही, सांडे तिच्या वरी.
सांजप्रभा - मराठी कविता | Sanjprabha - Marathi Kavita

रंग केशरी अन् पिवळा, मिसळे वरचेवरी, नभी नक्षत्रांची रास ही, सांडे तिच्या वरी

रंग केशरी अन् पिवळा
मिसळे वरचेवरी
नभी नक्षत्रांची रास ही
सांडे तिच्या वरी

मग हळूच तो लाल रंग ही
वाजवी प्रेमाची बासरी
सप्तसुरातली ही मेजवानी
वाटावी कोवळी

होई साजरी मग
चंद्रप्रभांच्या आठवांची सोहळी
मनातही कल्लोळांचे डोंगर
फुटती वरचे वरी

लक्ष जसे गोपिकांचे
त्या सावळ्या वरी
लिलात मग त्या कृष्णसंधेच्या
विरव चांदणे पडे

अशी ही सांज प्रभा मिळून
मग घेई स्वप्न साकडे

- अनिकेत शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.