कोण जाणे त्या दिवशी - मराठी कविता

कोण जाणे त्या दिवशी, मराठी कविता - [Kon Jaane Tya Divashi, Marathi Kavita] एक दारूण संध्याकाळ, तुफान पाऊस, आणि अशातच मला, जगायची हौस.
कोण जाणे त्या दिवशी - मराठी कविता | Kon Jaane Tya Divashi - Marathi Kavita

एक दारूण संध्याकाळ, तुफान पाऊस, आणि अशातच मला, जगायची हौस

एक दारूण संध्याकाळ
तुफान पाऊस
आणि अशातच मला
जगायची हौस

वडील दाखल
दवाखान्यात
आणि माझं मन
केसपेपरच्या रकाण्यात

दिवसभर येऊन जाऊन
थोडेफार नातेवाईक
आता कोण जाणे कसा
पण मी त्यांचा पाईक

हळूहळू वाढणारा
पावसाचा वेग
अन् परिस्थितीने आतड्याला
पडणारी भेग

सायंकाळी वडिलांचे
मंदावलेले श्वास
मगमला होणारा
पोरकेपणाचा आभास

माझ्या सोबतीला
निःसहाय आई
आणि तिला वडिलांना
थांबावयाची घाई

सतत प्रयत्न करणारे
हुशार डॉक्टर
आणि आमचा वाढणारा
फिअर फॅक्टर

भयंकर होती ती
अमावस्येची रात्र
अन् डोळ्यासमोर बाबांची
फक्त शिथिल गात्र

किर्र अंधारात घरी आलो
बाबांना शेवटचं भेटून
संबंध संपले त्यावेळी
पण ऋणानुबंध कुठून?

कोण जाणे त्या दिवशी
थांबला नाही पाऊस काही
अन् दुसर्‍या दिवशी एकत्रच
थांबलं सर्वकाही


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.