बॅचलरचं जग - मराठी कविता

बॅचलरचं जग, मराठी कविता - [Bachelor Cha Jag, Marathi Kavita] कॉलेज विश्वातल्या बॅचलर लाईफचं केलेलं सरळ साध्या सोप्या शब्दातलं वर्णन.
बॅचलरचं जग - मराठी कविता | Bachelor Cha Jag - Marathi Kavita

कॉलेज विश्वातल्या बॅचलर लाईफचं केलेलं सरळ साध्या सोप्या शब्दातलं वर्णन

ना झोपेचा पत्ता,
ना उठायचं टेन्शन,
एक तास आधी उठून attendence
मध्ये व्हायचो मेंशन

कॉलेज मधली कुठलीही जागा
कट्टा व्हायचा,
Lecture बुडवायला तर सारा class
तयार असायचा

Assignment, practical च्या वह्या
एका रात्रीत भरायच्या,
उत्तर येऊ की नको पण
Answer sheet पूर्ण भरायच्या

काय ती गंम्मत होती,
सरांचं lecture चालू आणि मध्येच
मागे आमच्या खोड्या असायच्या,
यायचं तर सर्वांनी नाही
तर कुणी नाही

मित्रात आमच्या दोन होते,
काहींचा खरा तर
काहींचा खर्रा,
दोन्ही खाऊन पिऊन
बिनदास्त रहा

तीन वर्षांचं होतं
बॅचलर च जग,
तेच जिवन जगण्यासाठी
आता पुन्हा धगधग

- सोमकांत दडमल

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.