कोरोना संसर्गकालातील काही अनुभव - मराठी कविता

कोरोना संसर्गकालातील काही अनुभव, मराठी कविता - [Corona Sansargakalatil Kahi Anubhav, Marathi Kavita] कोरोनामुळे तरी स्वच्छतेचे मंत्र समजून घेऊया.
कोरोना संसर्गकालातील काही अनुभव - मराठी कविता | Corona Sansargakalatil Kahi Anubhav - Marathi Kavita

स्वच्छतेचे मंत्र आम्हाला दिले; ते मंत्र आम्हाला आज कळायला लागले! कोरोना आला म्हणून

ज्या महात्म्यांनी स्वच्छतेचे मंत्र आम्हाला दिले
ते मंत्र आम्हाला आज कळायला लागले
तर का?
कोरोना आला म्हणून

भारताच्या संविधानातील समाज, धर्म, लोकशाही, गणराज्य
ह्या संकल्पना आज कळायला लागल्या
का? तर
कोरोना आला म्हणून

साहित्य साहित्याच्या दुनियेत होती
मात्र
जे साहित्यात नव्हते तेही काही अंशी
मनातील विचार शब्दात टिपायला लागली
का? तर
कोरोना आला म्हणून

जीवन! हा एक प्रश्न समोर असतो
जिवंत राहू तेव्हा जीवन जगू
असाही एक विचार येतो
तेव्हा जीवनाविषयी चिंतन व्हायला लागते
का? तर
कोरोना आला म्हणून

आधुनिकीकरणात माणूस स्वतःला गमावून बसला
आता स्व ची जाणीव व्हायला लागली
स्वयंसेवेचे, व्यायामाचे, आप्तसंबंधीयांचे
महत्व कळायला लागलं
का? तर
कोरोना आला म्हणून

कंपन्यात आता जीवनावश्यक वस्तुपेक्षा
अतिजीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन होतंय
ज्याने जीवाचं
रक्षण होईल
का? तर
कोरोना आला म्हणून

लोक घरात आहेत त्यांचं मनोरंजन व्हावं
प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी
संगीताची छोटी - छोटी स्फूर्ती गीते
गायली जात आहेत
का? तर
कोरोना आला म्हणून

राजकीय क्षेत्रातही सध्या अटी तटी चा भेद सरला
ते ही समदे कार्यात मग्न झाले
स्वकीयांना सुखरूप त्यांच्या घरी
परतावा देऊ लागले
का? तर
कोरोना आला म्हणून

शैक्षणिक संस्था चुप्पी साधून आहेत
असे नसुन तेही सरकारसमवेत
विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून
अधिकाधिक नावीन्यपूर्णपणे अध्यापन करताहेत
का? तर
कोरोना आला म्हणून

२४ तास सेवा पुरविणारी माध्यमही
समाजाला कोरोनाविषयी दिशानिर्देश करीत आहेत

- शुभम बंबाळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.