जरा हसू दे मुक्त होऊनी स्वतःच्याच मी पडण्यावरती
जरा हसू दे मुक्त होऊनी स्वतःच्याच मी पडण्यावरतीजरा वाहू दे अश्रू नयनी हारवलेल्या दिवसावरती
जरा सांगू दे आयुष्याच्या अनवाणी मार्गाच्या गोष्टी
जरा राहू दे खांद्यावरती थाप खरकटी थोडी उष्टी
जरा वाजू दे बडबड माझी भांडण माझे कळो जगाला
जरा खाऊ दे लाथा बुक्क्या खेद होऊ दे ह्या जगण्याला
जरा घुमू दे किंकाळी हे जीवन मी दुसऱ्यास्तव जगलो
जरा चिरु दे तुझे हृदय ही लपून आता मी ही थकलो
जरा थांबू दे पाणवठ्यावर तहान माझी अशी मिटेना
जरा पिऊ दे ओंजळीतूनी श्वास उद्याचे परवा नेण्या
जरा वाहू दे शुष्क नद्यांतून आनंदाचे पाणी थोडे
जरा जगू दे जीवन माझे जरा सुटू दे माझे कोडे