एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग १ - मराठी प्रेम कथा

एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग १, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 1, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा.

मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा

गुड मॉर्निंग, नमस्कार फ्रेंड्स मी वैष्णवी.“मुंबई मसाला” या शो मध्ये आपले स्वागत करते. तेवढयात माझा फोन वाजला. नीलम फोनवर होती. “हा बोल नीलम.” “अगं नऊ वाजता इंग्रजीचे नोट्स देणार आहेत. मी आणि कविता तुझी केव्हाची वाट पाहात आहोत.” मी घड्याळाकडे पाहिले, ८:२० झाले होते. “अगं मी पोहोचते लगेच. ओके बाय” म्हणून फोन कट झाला. इतक्यात आईचा आवाज आला. “वैष्णवी, अगं लवकर ये बाळा.” मी माझी बॕग घेतली. पटकन खाली आले, बाबा नाष्ता करत होते. शेजारच्या साठेकाकू सकाळीच आमच्या घरी आल्या होत्या. नेहमीप्रमाणे मी सर्वांना ‘गुड मॉर्निंग’ विश केलं. “खरंच, खूप गोड आवाज आहे तुमच्या मुलीचा.” मी त्यांना हलकसं स्माईल केलं. आईने समोर नाष्टा ठेवला. मी आपली पटपट नाष्टा करत होते. “अगं सावकाश खा! इतकी घाई का करतेस.” आई मला म्हणाली. “आई, आधीच फार उशीर झाला आहे. मला कॉलेजला जाऊन नोट्स कलेक्ट करायच्या आहेत.” मी आईला उत्तर दिलं. साठेकाकू मला म्हणाल्या, “वैष्णवी, अगं मी हे सांगायला आले होते आज आमचा अमित कॉलेजला येऊ शकणार नाही.” “का? काय झालं. तब्येत ठिक आहे ना त्याची?” मी साठेकाकूंना कारण विचारलं. “नाही ना. पहाटेपासून त्याला खूप ताप भरलाय.” अमित माझा क्लासमेट. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये सायन्स सेकंड इयरमध्ये शिकत आहोत. काकू मला म्हणाल्या, “तू येताना त्याच्या नोट्स आणशील का?” मी त्यांना ‘हो’ म्हणाले. “आई, बाबा मी येते.” असे म्हणून मी तडक माझ्या स्कूटीजवळ गेले. घड्याळ पाहिलं, ८:३० झाले होते. तेव्हा अचानक माझ्यापाशी तेजस, निकिता व श्री ही बच्चेकंपनी आली त्यांना माझ्याकडून त्यांनी लिहून आणलेली कविता ऐकायची होती. मी त्यांना ‘सायंकाळी कविता ऐकून दाखविन’, याचं प्रॉमिस दिलं. पटकन स्कूटी गेटच्या बाहेर काढली व कॉलेजच्या दिशेने निघाले. खूप उशीर होत होता.

एव्हाना माझ्या मैत्रीणींचे दोन तीन मिसकॉल्स येऊन गेले होते. मी स्कूटीचा वेग वाढविला. कशीबशी कॉलेजवर पोहोचले. गाडी पार्क करीत होते तेवढयात नीलम आणि कविता तिथे आल्या. “घ्या. आत्ता आल्या आहेत मॅडम. अगं किती उशिर केलीस यायला चितळे सरांचं लेक्चर सूरू देखील झालयं.” नीलमचं बोलणे ऐकून मी थोडी घाबरले कारण चितळे सरांचे बिहेविअर मला चांगलेच ठाऊक होतं. आम्ही धावत क्लासरूमपाशी आलो. दार आतून बंद होते. मी दार ठोठावले. सरांनी दार उघडलं व दारातच आमचा पाहूणचार घेऊ लागले. “या! आपलीच वाट पाहत होतो. फार लवकर आलात.” घड्याळ बघत ते आम्हाला म्हणू लागले. आम्ही क्लासमध्ये शिरलो त्यांनी प्रथम कविताला उशिरा येण्याचे कारण विचारलं. ती म्हणाली, “नाही सर मी तर वेळेत आले होते. नीलममुळे उशिर झाला.” सरांनी आपला मोर्चा नीलमकडे वळवला. नीलम आपला चष्मा काढत सरांना म्हणाली, “सर मी देखील वेळेत आले होते पण हिची वाट पाहण्यात वेळ गेला.” अशाप्रकारे दोघींनीही आपआपले हात वर केले. सर माझ्याकडे बघू लागले व त्या दोघींना जागेवर बसायला सांगितलं. माझ्याकडे बघत त्या दोघी जागेवर जाऊन बसल्या. मी खुणेने त्या दोघींना ‘बघून घेईन’ म्हणाले. सरांसोबत सारा वर्ग माझ्याकडे बघत होता. “सहाजिकच तुलाही याच प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.” सर मला म्हणाले. मी आपली सॅक सावरत सरांना म्हणाले. “घरातून बाहेर पडायला उशीर झाला. सॉरी सर!” “ह्या सॉरीवर माफी नाही मिळणार. पनिशमेंट घ्यावी लागेल.” सरांनी हातात छडी धरली. मला हात पुढे करायला सांगितले. सगळे विद्यार्थी आमच्याकडे बघत होते. सरांनी अलगदपणे छडी माझ्या हाताला स्पर्श केली व मला म्हणाले कि तुझ्यासारख्या गोड आवाज असणाऱ्या मुलीवर मी कशी छडी उगारणार. फक्त तुला शिक्षा ही असेल की येणाऱ्या स्नेहसंमेलनात तुला एखादं गाणं म्हणावं लागेल. सरांच्या बोलण्यावर वर्गात एकच हशा पिकला. मी सुटकेचा निःश्वास सोडला व सरांना ‘हो’ म्हणाले. सरांनी स्मितहास्य केलं. मी जागेवर जाऊन बसले. नोट्स वाटून झाल्या. लेक्चरही संपले.

[next] दुसरे लेक्चर सुरू असताना शिपाई काका वर्गात आले. ‘वैष्णवी कुंभार?‘ मी उभी राहिले. “तुला भंडारे मॅडमनी बोलावलं आहे.” मी मॅडमची परवानगी घेऊन बाहेर पडले. भंडारे मॅडम आमच्या कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत. मी टिचर केबीनकडे जात असताना गेटजवळ एक मुलगा आमच्या कॉलेजच्या काळे गेटकिपरकाकांशी हुज्जत घालत होता. त्या दोघांचे बोलणे मला ऐकू येतं होतं.“ओ काका, मला भंडारे काकींनी भेटायला बोलावलं आहे.” तो मुलगा काळेकाकांना म्हणाला. “काकू?” काळेकाकांनी त्याला प्रश्नार्थक पध्दतीने विचारलं. “म्हणजे मला भंडारे मॅडमनी बोलावलंय.” तो मुलगा काकांना म्हणाला. “अरे पण तुझं नाव काय? आणि तू गाडी कशी लावली आहेस बघ. इतर शिक्षकांनी गाडी आत कशी आणायची?” तो दिसतानाच थोडा उद्धट आणि खूप महत्वकांक्षी दिसत होता. तो काळेकाकांना उद्धट उत्तरे देऊ लागला. इतक्यात लाईट गेली म्हणून काका जनरेटर रूमकडे धावले.

मी पुढे जात असताना मला पाठीमागून ‘Excuse me’ असा आवाज ऐकू आला. मी बरोबर टिचर केबीनच्या दारात उभी होते. “भंडारे मॅडम मला कुठे भेटतील?” तो मुलगा मला म्हणाला. मी काही न बोलता केबीनमध्ये शिरले. मला पाहून भंडारे मॅडम म्हणाल्या “कुंभार, चितळे सरांनी गाण्यासाठी तुझं नाव सुचविले आहे. कोणते गाणं तू म्हणणार आहेस?” मी काही बोलणार इतक्यात तो मुलगा आत आला. भंडारे मॅडम त्याला म्हणाल्या “ये. तुझीच वाट पाहत होतो.” तो मुलगा माझ्या साईडला येऊन उभा राहिला. “हा कुंभार?” मॅडमनी मला पुन्हा प्रश्न विचारला. “मॅडम, अजून मी फिक्स गाणं निवडले नाही. दोन दिवसात तुम्हाला सांगते.” दबक्या आवाजात मॅडमना मी म्हणाले. यावर भंडारे मॅडम मला म्हणाल्या “लवकर कळवं. अठरा तारखेला फनीगेम्स सुरू होतं आहेत व वीस तारखेला आपले स्नेहसंमेलन आहे.” मॅडमच्या बोलण्यावर मला पायात साप सोडल्याची अनुभूती झाली. मी त्याच अवस्थेत मॅडमना ‘हो’ म्हणून बाहेर पडले. बाहेर पडत असताना एक छान परफ्युमचा सुवास माझ्या नाकात गेला तो सुवास त्या मुलाकडून येत होता. मला थोड्या वेळासाठी खूप फ्रेश वाटले.

[next] बेल वाजली. दुसरे लेक्चर संपले. नीलम आणि कविता माझ्याजवळ आल्या “काय ग, काय म्हणत होत्या मॅडम?” नीलमने मला विचारलं. मी सॕड आवाजात तिला म्हणाले, “काही नाही. कोणते गाणं च्यूझ केलं ते विचारत होत्या. हे चितळे सर पण ना!” नीलमही मला त्याच सुरात हा प्रश्न विचारत असताना “तुमच्या आवाजाला शोभेल असे गाणं निवडा." मला पाठीमागून हे वाक्य मोठ्या आवाजात ऐकू आले. आम्ही तिघींनी मागे वळून पाहिले. तो आवाज त्या मुलाचा होता. तो एका विलक्षण पध्दतीत आमच्या दिशेने चालत येत होता. “हाय! मी मोहित. मोहित गोडबोले.” त्याने माझ्यासमोर हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. क्षणभर आम्ही संदिग्ध अवस्थेमध्ये होतो. मला फेस रिडींग येत असल्याने मी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपू लागले. तो बोलत एक होता आणि त्याच्या डोळ्यात काही वेगळेच दिसत होते. तो बोलताना एकदम फ्री आणि रिलॅक्स वाटत होता. नंतर मी भानावर आले व त्याला माझी ओळख सांगितली. त्याने आपला हात मागे घेतला आणि मला म्हणाला, “मला भंडारे काकू आयमिन भंडारे मॅडमनीच सांगितले कि तुमचा आवाज फार गोड आहे व गेल्यावर्षी तुम्हाला ‘Best voice of the year’ चा अॕवॉर्ड देखील मिळाला होता.” मी होकारार्थी पध्दतीने मान हलवून त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. यावर तो ‘ग्रेट’ असे म्हणाला व त्याने आपले घड्याळ पाहिले. “ओह! खूप उशिर झाला. ओके बाय.” म्हणून तो तिथून निघाला. आम्ही नीलमकडे पाहिलं तर ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती. कविताने तिच्यासमोर चुटकी वाजवली मग ती भानावर आली आणि म्हणाली “हाय! किती हॅंडसम होता ना?” यावर मी तिथून लगेच काढता पाय घेतला. “हं, बायोलॉजी मध्ये लक्ष दे. म्हणे हॅंडसम. चल इथून.” असे म्हणत कविता नीलमला ओढत नेऊ लागली.

सर्व लेक्चर संपवून मी ठीक १२:३० वाजता घरी निघाले. अजून माझ्या नाकात तोच परफ्युमचा सुवास घुमत होता. मी चाळीत आले. तडक अमितच्या घरी गेले. मला पाहून अमित त्याच्या बेडवरून उठत होता. “अरे अमित, तू विश्रांती घे. उठू नकोस.” असे म्हणत मी त्याच्याजवळ गेले. “कशी आहे तब्येत?” “आता थोडे ठीक वाटत आहे.” अमित मला म्हणाला. मी माझ्या बॅगेतून त्याच्या नोट्स काढल्या व त्याच्या हातात दिल्या आणि त्याला म्हणाले, “वीस तारखेपासून आपल्या कॉलेजचे स्नेहसंमेलन सुरू होत आहे. तुला नेहमीप्रमाणे स्वयंसेवकाचे काम देणार आहेत.” यावर अमितने डोक्याला हात लावला. मला हसू आले. “आणि तुझं?” त्याने मला प्रश्न विचारला. मी हसू आवरत त्याला म्हणाले, “अरे तुला सांगायचं राहूनच गेलं. आज कॉलेजमध्ये... आणि वैष्णवीने त्याला कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिने तिचे घड्याळ पाहिले व त्याला म्हणाली “उप्स, अमित मी येते. आता गाणं निवडण्याचे एक्स्ट्रा काम मला लागले आहे.” असे म्हणून ती त्याच्या घरातून बाहेर पडते. दारात सॅंडेल घालत असताना अमित तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. ती त्याच्या घरातून बाहेर पडते. अमितला ते दिवस आठवतात जेव्हा वैष्णवीला त्याने पहिल्यांदा पाहिले होते.

[next] सकाळी मी जिममधून घरी आलो. माझ्या रूमची खिडकी उघडून थंड वारा व कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेत असताना माझी नजर समोरच्या खिडकीत गेली. तर त्या रूममध्ये एक सुंदर लंबगोल चेहऱ्याची तरूणी आपले ओले केस पुसत होती. मी खिडकीचा आडोसा घेतला व त्या सुंदर चेहऱ्यास न्याहाळू लागलो. तिच्या गालावर गोड खळी सतत येत होती. तिचा सुंदर चेहरा ‘खट्टामिठा’ प्रकारचा होता. तिचे सौंदर्य सूर्याच्या प्रकाशात पाचूसारखे चमकत होते. अचानक तिची नजर माझ्या खिडकीवर आली. तिने मला पाहिले असेल म्हणून मी घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले व खिडकीच्या आडोशाला लपून राहिलो. पण आता अमितला असे डोळे मिटून बसलेला पाहून त्याची आई त्याला विचारते, “काय रे, काय झालं?” अमित लगेच आपले डोळे उघडतो. समोरील दृश्य पाहून त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते “अं, काही नाही आई. वैष्णवी येऊन नोट्स देऊन गेली.” त्याची आई किचनमध्ये जाते व अमित आपल्या डोक्यावर अलगद मारून घेतो.

वैष्णवी घरी येते तेव्हा तिला तिचा लहान भाऊ सौरभ डोक्याला हात लावून बसलेला दिसतो व आई त्याला कसले तरी लेक्चर देत होती हे दिसते. सौरभ मला पाहून माझ्याकडे आला व मला म्हणाला कि “ए ताई, सांग ना आईला मला फक्त दोन दिवस “आऊट ऑफ मुंबई” जायचं आहे. तेही मित्रांसोबत जाणार आहे. पण बघ ना आई मला परवानगी देत नाहीये.” एकंदरीत सौरभला दोन दिवस आऊट ऑफ मुंबई जायचं होतं. पण आई त्याला परमिशन देत नव्हती असा प्रसंग होता. मी सोफ्यावर सॅक ठेवून आईकडे गेले पण तिला काही सांगायच्या आतच ती मला म्हणाली, “हे बघ. तू त्याची बाजू घेऊन मला काही सांगू नकोस. मी काही त्याला मुंबई बाहेर पाठविणार नाही.” तिचं हे बोलणे ऐकून सौरभ “पण आई?” असे म्हणताच आई त्याला डोळे मोठे करू लागली. तसा तो मला म्हणाला “पण ताई, कितीवेळा सतत ते 'एस्सेल वर्ल्ड व जुहू बीचवर’ जायचं आणि मी कोकणातच चाललो आहे.” सौरभची अशी अवस्था मला पाहावली नाही. मी आईला म्हणाले “आई. जाऊदे ना त्याला. किती दिवसानंतर तो बाहेर फिरायला जातो आहे.” मी सौरभला खूणवून म्हणाले ‘बघ रडत आहे तो’. तसे सौरभने आपल्या डोळ्यात खोटेनाटे पाणी आणले. आईचा स्वभाव लगेच मावळला. ती सौरभला म्हणाली “ए पिल्लू, रडू नको. बरं मी तुला काही अटींवर परवानगी देते.” तसा सौरभ खूश झाला व मला टाळी देऊन आपल्या रूममध्ये गेला. मीही आपल्या रूममध्ये गेले. १ वाजता बाबा घरी जेवायला आले. बाबांनी देखील त्याला लगेच परवानगी दिली.


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

अभिप्राय

ब्लॉगर: 2
  1. प्रत्युत्तरे
    1. एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा या मराठी प्रेम कथेचा भाग दोन प्रकाशित करण्यात आला आहे.

      हटवा
भारत सरकारच्या नवीन आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी दंडणीय गुन्हा आहे.

अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.

मराठीमाती डॉट कॉम प्रताधिकार, अस्वीकरण आणि वापरण्याच्या अटी.  सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,10,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,865,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,633,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,10,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,3,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,15,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,6,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,267,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,33,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,61,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निमित्त,3,निराकाराच्या कविता,6,निवडक,1,निसर्ग कविता,15,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,205,पालकत्व,6,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,9,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,9,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,72,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,87,मराठी कविता,486,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,22,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,28,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,12,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,353,मसाले,12,महाराष्ट्र,271,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,1,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,13,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,8,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,46,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,15,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,9,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,20,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,1,संदेश ढगे,37,संपादकीय,23,संपादकीय व्यंगचित्रे,14,संस्कार,1,संस्कृती,125,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,16,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,88,सायली कुलकर्णी,5,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,204,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग १ - मराठी प्रेम कथा
एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग १ - मराठी प्रेम कथा
एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग १, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 1, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा.
https://2.bp.blogspot.com/-mWIl6cV0YUY/XXjlL1YpzRI/AAAAAAAAEVk/eOewk83CgCsj2ym1DAhvLVCQbHpmZmYrwCLcBGAsYHQ/s1600/ektarphi-premachi-karanmimansa-part-1-marathi-prem-katha.jpg
https://2.bp.blogspot.com/-mWIl6cV0YUY/XXjlL1YpzRI/AAAAAAAAEVk/eOewk83CgCsj2ym1DAhvLVCQbHpmZmYrwCLcBGAsYHQ/s72-c/ektarphi-premachi-karanmimansa-part-1-marathi-prem-katha.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2019/09/ektarphi-premachi-karanmimansa-part-1-marathi-prem-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2019/09/ektarphi-premachi-karanmimansa-part-1-marathi-prem-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची