मंदार जाधव सोबत फिटनेसच्या गप्पा - मुलाखत

मंदार जाधव सोबत फिटनेसच्या गप्पा, मुलाखत - [Mandar Jadhav Fitness Interview, Interview].

श्री दत्तांची भूमिका साकारणारा मंदार जाधव फिटनेसच्या बाबतीत खुपच जागृक आहे

स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने भूमिकेसाठी वजन वाढवलं आहे. याशिवाय फिटनेसच्या बाबतीत तो खुपच जागृक आहे. त्याच्या फिटनेसचं रहस्य नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

मंदार श्री दत्तांची भूमिका तू साकारतो आहेस या भूमिकेसाठी तू बरीच मेहनतही घेतो आहेत त्याबद्दल काय सांगशिल?
दत्तगुरुंची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. खूप मोठी जबाबादारी आहे. या भूमिकेसाठी मी वजन वाढवलं आहे. भूमिकेसाठी ते गरजेचं होतं. शूटिंग सुरु होण्याआधी दोन महिन्यांचा अवधी माझ्याकडे होता. त्यामुळे योग्य व्यायाम आणि पौष्टिक आहाराच्या मदतीने मी वजन वाढवलं. या मालिकेत माझा बेअर बॉडी लूक आहे. त्यासाठी फिट रहाणं खूप गरजेचं आहे. त्यादृष्टीने माझा प्रयत्न असतो. या भूमिकेशी प्रेक्षकांच्या भावना जोडलेल्या आहेत. दत्तगुरुंच्या रुपात प्रेक्षक मला पहातात. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करतोय.

आरोग्य उत्तम राखण्यासाठी तु काय मंत्र देशील? उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली काय?
व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसुत्रींना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपण प्रत्येकाने स्वत:ला वेळ द्यायला हवा. शूटिंगच्या व्यस्त शेड्युल्डमधूनही मी व्यायामासाठी वेळ काढतोच. आपल्या आरोग्याची किल्ली आपल्याच हातात आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ हा काढायलाच हवा. चांगले विचार आणि सकस आहार हीच उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे.

तुझा आहार कसा असतो? त्याच्या वेळा ठरल्या आहेत का? कोणती पथ्यं पाळतोस?
हो मी खाण्यापिण्याचं पथ्य पाळतो. एक कलाकार म्हणून ही काळजी घ्यायलाच हवी. तुम्ही जे खाता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळे पौष्टिक गोष्टी खाण्याकडे माझा भर असतो. मी घरचं जेवण खातो. सेटवर मी नेहमी घरचा डबा घेऊन जातो. त्यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, फळं आणि संध्याकाळच्या वेळेसाठी पौष्टिक खाणं याचा समावेश असतो. मी बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळतो. बाहेर खाण्याची वेळ कधी आलीच तर हेल्दी गोष्टीच खाण्याकडे माझा कल असतो. तेलकट आणि गोड पदार्थ खाणं मी टाळतो. मोसमी फळं आणि भरपूर पाणी पिण्याचा कटाक्ष मी नेहमी पाळतो.

फिटनेससाठी काय टिप्स देशील आणि तु कुणाला गुरू मानतोस?
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायाम म्हणजे फक्त वजन उचलणं नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार व्यायामाची पद्धत ठरवू शकतात. कुणाला कार्डिओ करायला आवडतं कुणाला वेट ट्रेनिंग आवडतं. गेली दहा ते बारा वर्ष मी व्यायाम करतो आहे. अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही प्रेझेण्टेबल असणं महत्त्वाचं आहे. प्रेक्षक तुम्हाला टीव्हीवर पहात असतात. ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत मी श्री दत्तांची भूमिका साकारतो आहे. त्या भूमिकेला साजेसा असा माझा पेहराव असतो. त्यामुळे फिटनेस कायम राखण्याकडे माझा कल असतो. व्यायामाची माझी वेळ ठरलेली नसली तरी दिवसातला एक तास मी आवर्जून काढतो. शूटिंगला जाण्यापूर्वी किंवा शूटिंगनंतर मी व्यायाम करतो. शक्य झाल्यास सेटवरही व्यायाम करतो. ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या संपूर्ण टीमची यासाठी मला खूप मदत होते. व्यायामासोबतच योग्य आहाराची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तज्ञांकडून आणि इंटरनेटवरुन मी यासंदर्भात माहिती मिळवत असतो. रोज एकाच प्रकारचा व्यायाम मी करत नाही. त्यात बदल करतो. कधी पोटाचा, कधी कार्डिओ अश्या पद्धतीने व्यायामाची पद्धत मी बदलत असतो. दररोज आठ तास पुरेशी झोप घेतो. निरोगी रहाण्यासाठी झोपही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझला फिटनेसच्या बाबतीत मी माझा गुरु मानतो. या दोघांनीही स्वतला छान पद्धतीने मेण्टेन केलंय.

मानसिक आरोग्य कशावर अवलंबून असतं असं तुम्हाला वाटतं?
मानसिक आरोग्यासाठी आवडीची गाणी ऐकणं हाच माझा छंद आहे. आवडत्या गाण्यांमुळे माझा मूड फ्रेश रहातो. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. लहानपणापासूनच तसे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आता ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेमुळे अश्याच सकारात्मक वातावरणात मी दिवसभर असतो. फिल्मसिटीमध्ये आमच्या मालिकेचा भव्यदिव्य असा सेट आहे. खास बात म्हणजे मुंबईत असूनही निसर्गाच्या सानिध्यात हा सेट वसलाय. आजूबाजूला दाटीवाटीने असणारी वनराई, सेटवरचे आश्रम आणि कुटी एक वेगळीच ऊर्जा देतात. सेटवरचं वातावरण खुपच धार्मिक आहे. सहकलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. मानसिक आरोग्यासाठी आणखी काय हवं. मालिकेचा सेट म्हणजे दुसरं घरच झालंय. सध्या मालिकेत श्री गुरुदेव दत्तांचा २४ गुरु शोधण्याचा प्रवास सुरु आहे. त्यासाठी न चुकता पहा ‘श्री गुरुदेव दत्त’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,3,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,434,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,258,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,400,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,4,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,4,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,12,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,12,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,76,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,1,ऋचा मुळे,1,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,7,काव्य संग्रह,1,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,3,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,8,गुरूच्या आरत्या,1,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,26,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,215,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,1,तिच्या कविता,5,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश हंचाटे,1,दिवाळी फराळ,6,दुःखाच्या कविता,18,देवीच्या आरत्या,3,धोंडोपंत मानवतकर,2,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,31,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,169,पावसाच्या कविता,10,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,8,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,3,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,34,प्रेरणादायी कविता,8,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बेकिंग,3,भक्ती कविता,1,भाज्या,18,भाताचे प्रकार,9,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,27,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,44,मराठी कविता,186,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,308,मसाले,12,महाराष्ट्र,158,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,15,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,10,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,7,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,1,योगेश कर्डीले,1,राजकीय कविता,2,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,2,रोहित साठे,12,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,5,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,24,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,47,विष्णूच्या आरत्या,3,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,3,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,7,संजय पाटील,1,संजय बनसोडे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,115,सचिन पोटे,3,सण-उत्सव,11,सणासुदीचे पदार्थ,23,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,24,सायली कुलकर्णी,3,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,5,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,2,स्वाती खंदारे,162,स्वाती दळवी,2,स्वाती वक्ते,1,ह मुलांची नावे,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,33,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: मंदार जाधव सोबत फिटनेसच्या गप्पा - मुलाखत
मंदार जाधव सोबत फिटनेसच्या गप्पा - मुलाखत
मंदार जाधव सोबत फिटनेसच्या गप्पा, मुलाखत - [Mandar Jadhav Fitness Interview, Interview].
https://4.bp.blogspot.com/-lece-1o2-Is/XVo1X0hMj8I/AAAAAAAAEIg/J3Z1rWTWaHge8xBvvJKYsjiZMdIUn1lsgCLcBGAs/s1600/mandar-jadhav-fitness-interview.jpg
https://4.bp.blogspot.com/-lece-1o2-Is/XVo1X0hMj8I/AAAAAAAAEIg/J3Z1rWTWaHge8xBvvJKYsjiZMdIUn1lsgCLcBGAs/s72-c/mandar-jadhav-fitness-interview.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2019/08/mandar-jadhav-fitness-interview.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2019/08/mandar-jadhav-fitness-interview.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy